Join us  

बॉलीवूडची 'ही' अभिनेत्री करणार ट्वेन्टी-20 विश्वचषकाचे अनावरण

बॉलीवूडची अभिनेत्री विश्वचषकाचे अनावरण करताना पाहायला मिळेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 5:13 PM

Open in App

मुंबई : ऑस्ट्रेलियामध्ये आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. या विश्वचषकाचे अनावरण बॉलीवूडची एक सुंदर अभिनेत्री करणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. मेलबर्न येथे विश्वचषकाच्या अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी बॉलीवूडची अभिनेत्री विश्वचषकाचे अनावरण करताना पाहायला मिळेल.

पुरुषांचा विश्वचषक हा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे, तर महिलांचा विश्वचषक फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवण्यात येणार आहे. आता या विश्वचषकाच्या ट्रॉफीचे अनावरण भारताची कोणती अभिनेत्री करणार, याची उत्सुकता तुम्हाला लागलेली असेल. ही अभिनेत्री भारताच्या माजी कर्णधारांची सून आहे. त्याचबरोबर तिचे कुटुंब क्रिकेट आणि बॉलीवूडशी बऱ्याच काळापासून जोडले गेलेले आहे.

विश्वचषकाच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यासाठी बॉलीवूडमधील करीना कपूरला आमंत्रण देण्यात आलेले आहे. याबाब करिना म्हणाली की, " माझ्यासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. हा माझा मोठा सन्मान आहे. आपले स्वप्न साकार करणाऱ्या क्रिकेटपटूंचा उत्साह वाढवणे हे माझे काम असेल. माझे सासरे महान क्रिकेटपटूंपैकी एक होते. त्यामुळे मला महिला क्रिकेट विश्वचषकाच्या ट्रॉफीचे अनावरण करण्याची जबाबदारी देणे म्हणजे माझा सन्मान आहे."

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार भारतीय पुरुष संघाला गट क्रमांक 2 मध्ये  देण्यात आले आहे. 2011च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंनतर भारत आणि पाकिस्तान हे आयसीसीच्या स्पर्धेत प्रथमच साखळी गटात एकमेकांसमोर येणार नाहीत. पाकिस्तानला गट क्रमांक 1 मध्ये स्थान देण्यात आले आहे. 2011नंतर आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत-पाक पाचवेळा समोरासमोर आले आणि 2019च्या वर्ल्ड कपमध्येही ते एकमेकांना भिडणार आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या 2020च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये उभय संघ साखळीत समोरासमोर येण्याची शक्यता नाही.

ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रता फेरीतून सहा संघांनी मुख्य फेरीत प्रवेश केला. ओमान हा या मुख्य फेरीत प्रवेश मिळवणारा अंतिम संघ ठरला. ओमानच्या शिक्कामोर्तबानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम 16 संघ निश्चित झाले आहेत. त्यामुळे आता ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया स्पर्धेतील सहभागी होणारे संघ आणि वेळापत्रक...- सुपर 12 मध्ये प्रवेश निश्चित असलेले संघ कोणतेपाकिस्तान, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया ( यजमान) , दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान

- सुपर बारासाठीच्या चार जागांसाठी कोणार चुरस ( या संघांची A व B गटात विभागणी ) श्रीलंका, बांगलादेश, पापुआ न्यू गिनी, नामिबिया, नेदरलँड्स, आयर्लंड, स्कॉटलंड, ओमान 

असे आहेत दोन गटगट 1 - पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, गट A विजेता, गट B उप-विजेतागट 2- भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, गट A उप-विजेता, गट B विजेता 

असे असतील भारताचे सामने24 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण अफ्रीका (पर्थ स्टेडियम)29 ऑक्टोबर - भारत वि. पात्रता गट 2 (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)1 नोव्हेंबर - भारत वि. इंग्लंड (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)5 नोव्हेंबर - भारत वि. पात्रता गट B1 (एडिलेड ओव्हल)8 नोव्हेंबर - भारत वि. अफगाणिस्तान (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)उपांत्य फेरी 11 नोव्हेंबर – पहिली उपांत्य फेरी (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)12 नोव्हेंबर – दुसरी उपांत्य फेरी (एडिलेड ओव्हल)अंतिम सामना 15 नोव्हेंबर (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड).

टॅग्स :टी-२० क्रिकेटकरिना कपूर