Join us  

हार्दिक पंड्याच्या मदतीसाठी धावून आली बॉलीवूडची 'ही' अभिनेत्री

मुर्ख असणे हा गुन्हा ठरू शकत नाही....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 5:26 PM

Open in App

मुंबई : 'कॉफी विथ करण- 6' या कार्यक्रमातील हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलच्या विधानांची जोरदार चर्चा सुरु आहे. या विधानांची बीसीसीआयकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. बीसीसीआयने पंड्या आणि राहुल या दोघांचेही निलंबन केले आहे. बीसीसीआयने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती पंड्या आणि राहुल यांची चौकशी करणार आहे. त्याचबरोबर या समितीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने आपले मत व्यक्त करावे, असे बीसीसीआयने म्हटले आहे. एकिकडे हे सारे घडत असताना बॉलीवूडची एक अभिनेत्री हार्दिकच्या मदतीला धावून आली आहे.

बॉलीवूडमधील स्वरा भास्करने एक ट्विट केले आहे. यामध्ये स्वराने म्हटले आहे की, " मुर्ख असणे हा गुन्हा ठरू शकत नाही. बीसीसीआय याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे मत मागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाला अजून दुसरे कोणतेच काम नाही का..."

निलंबनाची कारवाई झाल्यावर पंड्याने स्वत:ला एका रुममध्ये कोंढून घेतले होते. घरी कुठल्याही व्यक्तीबरोबर तो संवाद साधत नव्हता. पण आज मात्र पंड्या या निलंबनानंतर पहिल्यांदा बाहेर पडला. यावेळी हार्दिकबरोबर त्याचा भाऊ कृणालही होता.

हार्दिक पंड्याची एक्स गर्लफ्रेंड काय म्हणाली, जाणून घ्या...

या साऱ्या प्रकरणावर एली अवराम म्हणाली की, " मी पाहिलेला हार्दिक पंड्या हा नक्कीच नाही. कारण मी हार्दिकला जवळून ओळखते. यापूर्वी हार्दिक अशी गोष्ट कधीही बोललेला नाही. तुम्ही जेव्हा मोठ्या स्तरावर जाता तेव्हा तुम्हाला काही लोकं आदर्श मानत असतात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची विधानं केलीत तर तुम्ही त्यांच्या मनातून उतरू शकता." 

टॅग्स :हार्दिक पांड्यास्वरा भास्कर