संचालन परिषदेची बैठक २ ऑगस्ट रोजी

आयपीएल आयोजन : विविध विषयांवर होणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 04:56 AM2020-07-29T04:56:05+5:302020-07-29T04:56:23+5:30

whatsapp join usJoin us
Board of Directors meeting on 2nd August | संचालन परिषदेची बैठक २ ऑगस्ट रोजी

संचालन परिषदेची बैठक २ ऑगस्ट रोजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल)संचालन परिषदेची बैठक २ ऑगस्ट रोजी होत आहे. या बैठकीत यूएईत होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या पर्वाच्या वेळापत्रकास अंतिम स्वरूप दिले जाईल शिवाय अन्य मुद्यांवर चर्चा अपेक्षित आहे. कोरोनामुळे भारताबाहेर १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत स्पर्धेचे आयोजन होईल.
आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी आयपीएल संचालन परिषदेची बैठक २ ऑगस्ट रोजी होईल, असे सांगून या बैठकीत आयपीएल वेळापत्रक तसेच अन्य मुद्यांवर चर्चा केली जाईल, अशी माहिती वृत्तसंस्थेला दिली.


क्रीडा मंत्रालयाचीे मंजुरी
क्रीडा मंत्रालयाने आयपीएलचे आयोजन यूएईत करण्यासाठी बीसीसीआयला परवानगी बहाल केली. बीसीसीआयला आता गृह आणि परराष्टÑ व्यवहार मंत्रालयाची परवानगी हवी आहे. क्रीडा मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाºयाने आयपीएलचा प्रस्ताव मान्य केल्याचे सांगितले.
गांगुली, शाह सहभागी होणार
बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ अधिकाºयानुसार आयपीएल संचालन परिषदेच्या बैठकीत बीसीसीआयचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील. त्यात अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह यांचाही समावेश असेल. बैठकीत विविध हितधारकांशी संबंधित मुद्यांवर चर्चा केली जाईल. गांगुली आणि शाह यांचा बीसीसीआयचे अध्यक्ष तसेच सचिवपदाचा कार्यकाळ संपला आहे. तथापि या दोघांनी लोढा समितीच्या ‘कुलिंग आॅफ’पिरियडच्या अटीतून सूट मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. १७ आॅगस्ट रोजी या याचिकेवर नुसावणी होणार आहे.


जैव सुरक्षा वातावरणात आयोजन
यंदाच्या आयपीएलमध्ये एकाच दिवशी दोन सामन्यांचे आयोजन कमी प्रमाणावर होणार असल्याने याचा लाभ प्रसारकांना मिळणार आहे. सामन्यांचे आयोजन रिकाम्या स्टेडियममध्ये जैव सुरक्षा वातावरणात केले जाईल. यामुळे फ्रॅन्चायसींचे ‘गेट मनी’चे जे नुकसान होईल, त्यावरदेखील तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे. आयपीएल सुरू होण्याआधी अनेक फ्रॅन्चायसी स्वत:च्या तपास पथकाला यूएईत पाठवून तेथील सुविधा आणि जैव सुरक्षा वातावरणाची खात्री करून घेणार आहेत. (वृत्तसंस्था)

खेळाडूंसोबत कुटुंब असेल का?
बैठकीत ज्या प्रमुख मुद्यांवर चर्चा केली जाईल त्यात खेळाडूंना कुटुंब सोबत नेण्याची परवानगी असेल का, हा मुख्य मुद्दा असणार आहे. एका फ्रॅन्चायसीच्या अधिकाºयानुसार खेळाडूंना दोन महिने त्यांची पत्नी तसेच कुटुंबापासून दूर ठेवणे सोयीचे होणार नाही. स्थिती सामान्य असेल तर पत्नी किंवा गर्लफ्रेण्ड खेळाडूंसोबत प्रवास आणि वास्तव्य करतात. सध्या मात्र वेगळी स्थिती आहे. कुटुंब खेळाडूंसोबत असेल तरी त्यांना हॉटेलमध्येच वास्तव्य करावे लागेल. काही खेळाडूंना लहान मुले आहेत. दोन महिने ही लहान मुले हॉटेलच्या खोलीत कशी काय वास्तव्य करू शकतील? कोरोना काळात दिशानिर्देशांचे कठोर पालन केले जाणार असल्याने खेळाडू सराव आणि सामन्याचा कालावधी वगळता अन्य वेळ कुटुंबाला देऊ शकतील. तथापि यंदा खेळाडूसोबत कुटुंबीय नसतील, तर अधिक सोयीचे होईल, असे मत या अधिकाºयाने व्यक्त केले.

Web Title: Board of Directors meeting on 2nd August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.