मुंबई : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने सोमवारी 44 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेळीसोबत सेल्फी काढली. मात्र त्याने त्या फोटोखाली भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव लिहिले. विराटने वन डे तील 38वे शतक झळकावल्यानंतर बीसीसीआयने त्याला GOAT ( Greatest of all time) असे संबोधले होते. वॉननेही विराटच्या खेळीचे कौतुक केले होते.
सोमवारी त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केले की,''सर्वांना शुभ प्रभात... विराटसोबत वाढदिवसाची सेल्फी!!'' या पोस्टमध्ये शेळी होती, त्यामुळे भारतातील चाहत्यांना वॉनची ही चेष्टा आवडली नाही.
View this post on Instagram