Join us  

Todd Astle's Retirement : न्यूझीलंडला मोठा धक्का; कसोटी सामन्यापूर्वीच खेळाडूने घेतली निवृत्ती

Todd Astle's Retirement : मर्यादीत षटकांच्या सामन्यांवर लक्ष एकाग्र करण्याचे एका न्यूझीलंडच्या खेळाडूने ठरवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 5:01 PM

Open in App

ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : न्यूझीलंडला पहिल्या दोन्ही ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. पण त्यानंतर न्यूझीलंडला आता एका खेळाडूच्या रुपात मोठा धक्का बसला आहे. कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच न्यूझीलंडच्या एका खेळाडूने निवृत्ती घेतली आहे.

सध्याचे क्रिकेट कमालीचे व्यस्त झाले आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकाराच्या क्रिकेटला सर्वच क्रिकेटपटूंना वेळ देता येत नाही. त्यामुळे क्रिकेटच्या काही प्रकारांवर लक्ष एकाग्र करण्याचे खेळाडू ठरवतात. त्यासाठी काही क्रिकेटच्या प्रकारातून खेळाडू निवृत्ती घेतात. 

सध्याच्या घडीला न्यूझीलंडच्या संघाला मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. मर्यादीत षटकांच्या सामन्यांवर लक्ष एकाग्र करण्याचे एका न्यूझीलंडच्या खेळाडूने ठरवले आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या अनधिकृत कसोटी सामन्यांमध्ये तो खेळणार नाही.

टॉड अॅस्टल हा न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू आहे. मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये खेळायचे असल्यामुळे त्याने प्रथम श्रेणी सामन्यांमधून निवृत्ती घेतली आहे. काही दिवसांनी भारताच्या अ संघाबरोबर न्यूझीलंडच्या स्थानिक संघाचा सामना खेळवण्यात येणार आहे. प्रथम श्रेणी सामन्यातून निवृत्ती घेतल्यामुळे टॉडला आता या अनधिकृत कसोटी सामन्यात खेळता येणार नाही.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंड