Join us  

मोहम्मद शमीला मोठा धक्का; पत्नी हसीन जहाँ उचलणार 'हे' पाऊल

हसीन जहाँने आपल्या फेसबूकवरून शमीचा चांगलाच समाचार घेतला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 4:23 PM

Open in App

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा क्रिकेटच्या मैदानात जबरदस्त फॉर्मात आहे. पण दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात शमीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आता त्याची पत्नी हसीन जहाँ एक मोठे पाऊल उचलायचे ठरवले आहे.

मोहम्मद शमी हा चारित्र्यहीन माणूस आहे, असा गंभीर आरोप त्याची पत्नी हसीन जहाँने केला होता. आपल्या फेसबूक अकाऊंटवरून हसीनने हा आरोप केला होता. त्याचबरोबर शमीच्या भावाने माझ्यावर बलात्कार केला होता, असा आरोपही हसीनने केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत आणि हसीनने याबाबत कोर्टात याचिकाही दाखल केली आहे.

हसीन जहाँने आपल्या फेसबूकवरून शमीचा चांगलाच समाचार घेतला होता. यामध्ये हसीन म्हणाली होती की, " शमीने टिक-टॉकचे अकाऊंट उघडले आहे. चारीत्र्यहीन शमी तोकडे कपडे घालणाऱ्या मुलींना फॉलो करतो आहे. शमीच्या अकाऊंटमध्ये 97 व्यक्ती आहेत, ज्यामध्ये 90 मुली आहेत. स्वत: एका मुलीचा बाप असलेला शमी हा अशा वाईट गोष्टी करताना दिसत आहे." 

भारताचा वेगावान गोलंदाज मोहम्मद शमीविरुद्ध कोलकाता अलिपोर कोर्टाने अटर वॉरेंट काढले होते. पण बीसीसीआय मात्र शमीच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली होती. पोलिसांनी त्याला पंधरा दिवसांमध्ये हजर राहण्याचे आदेश अलिपोर कोर्टाने दिले होते. पण बीसीसीआयने यावेळी शमीच्या बाजू घेतली असून काही गोष्टींची पूर्तता केल्याशिवाय शमीला अटक होऊ शकत नाही, अशी भूमिका बीसीसीआयने घेतली होती.

 हसीन जहाँच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीनने मोहम्मद शमी, त्याची आई, मोठा भाऊ आणि वहिनीविरोधात घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली. तसेच हसीन जहाँने दर महिन्याला १० लाख रुपये भत्त्याची मागणी केली होती. हसीनने ७ लाख रुपये कुटुंबाचा मेंटेनन्स आणि ३ लाख रुपये मुलीसाठी अशी १० लाखांची मागणी केली होती. केस दाखल केल्यानंतर हसीनने कोर्टात सादर झाला नसल्याचा आरोप केला. एप्रिल २०१९ मध्ये पतीच्या घरी जाऊन गोंधळ घातल्याप्रकरणी हसीनला उत्तर प्रदेशातील अमरोही येथे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिची जामिनावर सुटका झाली होती.

हसीन म्हणाली आहे की, " मोहम्मद शमीच्या दबावामुळे माझे वकिलपत्र घ्यायला कोणीही तयार नाही. पण मी सत्याच्या बाजूने लढणारी असून मी हार मानणार नाही. मला एकही वकिल माझी बाजू मांडण्यासाठी भेटलेला नाही. त्यामुळे मी स्वत: ही केस लढवणार आहे."

टॅग्स :मोहम्मद शामी