रिषभ पंत IPL 2024 खेळणार, चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; BCCI ने दिलं फिटनेस सर्टीफिकेट, पण... 

IPL 2024, Rishabh Pant Fitness Test :  इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 09:34 AM2024-03-11T09:34:19+5:302024-03-11T09:34:44+5:30

whatsapp join usJoin us
Big news for Delhi Capitals as captain Rishabh Pant receives fitness certificate, cleared to play IPL 2024, but he can't play as a weeketkeeper  | रिषभ पंत IPL 2024 खेळणार, चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; BCCI ने दिलं फिटनेस सर्टीफिकेट, पण... 

रिषभ पंत IPL 2024 खेळणार, चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; BCCI ने दिलं फिटनेस सर्टीफिकेट, पण... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Rishabh Pant Fitness Test :  इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. संघाचा कर्णधार रिषभ पंत आयपीएल २०२४ खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. पंतला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून ( NCA ) फिटनेस प्रमाणपत्रही मिळाले आहे. कालपर्यंत अशी बातमी होती की, रिषभ पंतला फिटनेस सर्टिफिकेट न मिळाल्याने त्याच्या आयपीएल खेळण्यावर संभ्रम होते. दिल्लीने पंतचा फिटनेस अहवाल मागितला होता, पण संघ व्यवस्थापनाला बीसीसीआयकडून कोणतेही उत्तर मिळाले नव्हते.


पण आता सूत्रांनी आज तकला सांगितले की पंतला फिटनेस प्रमाणपत्र मिळाले आहे. अशा परिस्थितीत तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना दिसेल. २२ मार्चपासून आयपीएल सुरू होणार आहे.  पंत सध्या IPL 2024 च्या जाहिरातीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यानंतर तो काही दिवसांसाठी दिल्लीत दाखल होऊ शकतो. आयपीएल २०२४ च्या हंगामात, दिल्ली संघाला विशाखापट्टणममध्ये सलामीचा सामना खेळायचा आहे. IPL मध्ये रिषभ पंत कोणत्या भूमिकेत दिसणार? तो संघाचे कर्णधारपद भूषवताना दिसेल की खेळाडू म्हणून खेळताना दिसेल? या प्रश्नांबाबत कॅपिटल्स फ्रँचायझीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


दिल्ली फ्रँचायझी पंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द लक्षात घेऊन त्याच्यावर कोणताही दबाव टाकणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. पंत यष्टिरक्षण करताना दिसणार नाही, हे निश्चित आहे. तो फलंदाज म्हणूनच मैदानावर दिसेल. पंतच्या भूमिकेबद्दल आणि आयपीएलमध्ये परतण्याबाबत बीसीसीआय आणि दिल्ली फ्रँचायझीकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. दिल्ली संघाला २३ मार्च रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. यानंतर २८ मार्चला राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामना होणार आहे. 

Web Title: Big news for Delhi Capitals as captain Rishabh Pant receives fitness certificate, cleared to play IPL 2024, but he can't play as a weeketkeeper 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.