Join us  

Big News : अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्सची साथ सोडणार, IPL 2020मध्ये नव्या संघाकडून खेळणार

आयपीएलच्या 2020साठीची लिलाव प्रक्रिया 19 डिसेंबरला कोलकाता येथे पार पडणार आहे. पण, तत्पूर्वी सहभागी संघ खेळाडूंची अदलाबदल करत आहेत आणि काल मुंबई इंडियन्सच्या जाळ्यात महत्त्वाचा खेळाडू लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 12:57 PM

Open in App

आयपीएलच्या 2020साठीची लिलाव प्रक्रिया 19 डिसेंबरला कोलकाता येथे पार पडणार आहे. पण, तत्पूर्वी सहभागी संघ खेळाडूंची अदलाबदल करत आहेत आणि काल मुंबई इंडियन्सच्या जाळ्यात महत्त्वाचा खेळाडू लागला आहे. शिवाय राजस्थान रॉयल्सनेही एका युवा खेळाडूला आपल्या चमून दाखल करून घेतले आहे. त्यांनी न्यूझीलंडचा जलदगती  गोलंदाज ट्रेंट बोल्टला आपल्या संघात सहभागी करून घेतले आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांनी बोल्टला संघात घेतले. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सनं अंकित रजपूतला आपल्या संघात घेतले. IPL2020च्या ट्रेडमध्ये आता आणखी एक मोठं नाव आलं आहे. राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे पुढील मोसमात नव्या संघाकडून खेळताना दिसणार आहे.

मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी दमदार झाली आहे. त्यामुळे 2020च्या मोसमातही तेच जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांनी आज न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टला आपल्या संघात सहभागी करून घेतले आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांनी बोल्टला संघात घेतले. बोल्टनं 2014मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2018 व 2019मध्ये त्यानं दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले. त्यानं 33 सामन्यांत 38 विकेट्स घेतल्या आहेत.

दुसरीकडे राजस्थान रॉयल्सनं अंकित रजपूतला आपल्या संघात घेतले आहे. किंग्स इलेव्हन पंजाबकडून त्यांनी राजपूतला घेतले. रजपूतनं 2018च्या हंगामात 23 सामन्यांत 22 विकेट्स घेतल्या आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेतील त्रिपुरा विरुद्ध उत्तर प्रदेश या सामन्यात रजपूतनं विक्रम केला. 

अजिंक्य रहाणे होणार दिल्लीकरराजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अजिंक्य रहाणेसाठीची देवाणघेवाण जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. रहाणे 2011पासून राजस्थान रॉयल्सचा सदस्य आहे आणि  2012च्या मोसमात त्यानं आयपीएलमध्ये शतकही झळकावलं होतं. त्यानंतर तो राजस्थानचा प्रमुख फलंदाज आहे. 2016 व 2017मध्ये त्यानं रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे प्रतिनिधित्व केलं. पण, आता अजिंक्य पुढील मोसमात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. 

''अजिंक्य रहाणेला आपल्या संघात घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स प्रयत्नशील आहेत. याबाबत आधीच घोषणा करणं घाईचं ठरेल. अजिंक्यला करारबद्ध करण्यापूर्वी अनेक बाबींची पूर्तता करायला हवी,'' असे सूत्रांनी सांगितले. दिल्लीनं यापूर्वी अश्विन आणि मयांक मार्कंडेला करारबद्ध केले आहे. अजिंक्यच्या संघात येण्यानं दिल्लीची फलंदाजांची फळी अधिक मजबूत होणार आहे.   

टॅग्स :आयपीएलअजिंक्य रहाणेराजस्थान रॉयल्सदिल्ली कॅपिटल्स