Big Breaking : इंडियन प्रीमिअर लीगच्या प्ले ऑफचे वेळापत्रक जाहीर, दुबईत रंगणार अंतिम सामना

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) प्ले ऑफचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

By स्वदेश घाणेकर | Published: October 25, 2020 08:45 PM2020-10-25T20:45:17+5:302020-10-25T20:56:32+5:30

whatsapp join usJoin us
Big Breaking: Indian Premier League 2020 play-off schedule announced, final match to be played in Dubai | Big Breaking : इंडियन प्रीमिअर लीगच्या प्ले ऑफचे वेळापत्रक जाहीर, दुबईत रंगणार अंतिम सामना

Big Breaking : इंडियन प्रीमिअर लीगच्या प्ले ऑफचे वेळापत्रक जाहीर, दुबईत रंगणार अंतिम सामना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) प्ले ऑफचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबई इंडियन्स ( Mumabi Indians), दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) , रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांनी प्रत्येकी १४ गुणांची कमाई करताना प्ले ऑफच्या उंबरठ्यावर मजल मारली आहे. चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) ( १२ गुण) आघाडीवर असले तरी किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab), सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad)  यांना संधी आहेच. त्यात आज प्ले ऑफचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दुबईत अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

मुंबई इंडियन्स १० सामन्यात ७ विजयांसह १४ गुणांची कमाई करताना अव्वल स्थानी विराजमान आहे. दिल्ली कॅपिटल्सची विजयाची लय मागील दोन सामन्यांत हरवलेली दिसली. त्यांनी ११ सामन्यांत ७ विजयांसह १४ गुणांची कमाई केली आहे. रॉयल चॅलेंजर्सनेही ११ सामन्यांत १४ गुण कमावले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स १२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. पण, या स्थानावरील पकड मजबूत करण्यासाठी त्यांना उर्वरित तीन सामन्यांत दोन विजय मिळवावे लागतील.
चौथ्या स्थानासाठी किंग्स इलेव्हन पंजाब ( १० गुण), सनरायझर्स हैदराबाद (८) हेही शर्यतीत आहेत. पंजाबनं मागील चारही सामने जिंकून तगड्या संघांना धक्का दिला आहे. त्यामुळे त्यांचे वादळ न रोखल्यास चौथ्या स्थानी ते झेप घेऊ शकतात.

प्ले ऑफचे वेळापत्रक
क्वालिफायर १ - ५ नोव्हेंबर ( दुबई)
एलिमिनेटर - ६ नोव्हेंबर ( अबु धाबी)
क्वालिफायर २ - ८ नोव्हेंबर ( अबु धाबी)
अंतिम सामना - १० नोव्हेंबर ( दुबई) 

Web Title: Big Breaking: Indian Premier League 2020 play-off schedule announced, final match to be played in Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.