Big Blow to CSK : चेन्नई सुपर किंग्सच्या मॅच विनर खेळाडूची निवृत्ती, IPL 2021च्या जेतेपदात सिंहाचा वाटा; जिंकलाय ट्वेंटी-२० वर्ल्ड कप

रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) IPL 2023 मध्ये CSK कडून खेळणार नाही, अशी दाट शक्यता असताना आणखी एका मॅच विनर खेळाडूने निवृत्ती जाहीर केली  आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 07:42 PM2022-09-14T19:42:37+5:302022-09-14T19:45:07+5:30

whatsapp join usJoin us
Big Blow to CSK : Indian Wicketkeeper batter Robin Uthappa announces retirement from all forms of Indian cricket  | Big Blow to CSK : चेन्नई सुपर किंग्सच्या मॅच विनर खेळाडूची निवृत्ती, IPL 2021च्या जेतेपदात सिंहाचा वाटा; जिंकलाय ट्वेंटी-२० वर्ल्ड कप

Big Blow to CSK : चेन्नई सुपर किंग्सच्या मॅच विनर खेळाडूची निवृत्ती, IPL 2021च्या जेतेपदात सिंहाचा वाटा; जिंकलाय ट्वेंटी-२० वर्ल्ड कप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर २०२३ला सुरुवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सला धक्क्यांमागून धक्के मिळताना दिसत आहे. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) IPL 2023 मध्ये CSK कडून खेळणार नाही, अशी दाट शक्यता असताना आणखी एका मॅच विनर खेळाडूने निवृत्ती जाहीर केली  आहे. आयपीएल २०२०मधील लाजीरवाण्या कामगिरीनंतर जेव्हा CSK ने आयपीएल २०२१साठी कंबर कसली तेव्हा जेतेपदापर्यंतच्या प्रवासात या खेळाडूचा खूप मोठा वाटा होता. त्याने क्वालिफायर १ मध्ये ४४ चेंडूंत ६३ धावांची खेळी केली होती आणि फायनलमध्ये १५ चेंडूंत ३१ धावा चोपून संघाला जेतेपद पटकावून दिले होते. आता हा मॅच विनर खेळाडू आयपीएल २०२३मध्ये संघाचा सदस्य नसणार आहे. त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

- ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेता
- आयपीएलची तीन जेतेपदं नावावर
- आयपीएल २०१४मध्ये ऑरेंज कॅप विजेता
- २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध ३९ चेंडूंत ५० धावा 

भारताने आजच्याच दिवशी २००७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत थरारक विजय मिळवला होता. पाच-पाच चेंडूंच्या त्या निर्णायक सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांना यष्टिंचा वेध घेता आला नव्हता आणि ज्याने भारताकडून तीसरा व निर्णायक चेंडू टाकून यष्टिंचा वेध घेतला होता, त्या रॉबीन उथप्पाने ( Robin Uthappa announces retirement ) बुधवारी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज उथप्पाने ४६ वन  डे व १३ ट्वेंटी-२० सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले. वन डेत त्याच्या नावावर ९३४ धावा, तर ट्वेंटी-२०त २४९ धावा आहेत. आयपीएलमध्ये उथप्पाने अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. आयपीएलमध्ये २०५ सामन्यांत ४९५२ धावा नावावर असलेल्या उथप्पाने CSKला आयपीएल २०२१चे जेतेपद जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

त्याने ट्विट करून निवृत्तीची घोषणा करताना लिहिले की, ''२० वर्ष मी व्यावसायिक क्रिकेट खेळतोय आणि या कालावधीत मला देशाच्या, कर्नाटक राज्याच्या संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. हा प्रवास चढ-उतारांचा होता, परंतु प्रेरणादायी होता. पण, सर्व चांगल्या गोष्टींचा अंत असतो आणि त्यामुळेच जड अंतःकरणाने मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतोय. मला माझ्या लहान बाळाला, कुटुंबाला वेळ द्यायचा आहे.'' उथप्पाने बीसीसीआय, राज्य क्रिकेट संघटना, मुंबई इंडियन्स, RCB, पुणे वॉरियर्स, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाइट रायडर्स यांचेही आभार मानले. 

Web Title: Big Blow to CSK : Indian Wicketkeeper batter Robin Uthappa announces retirement from all forms of Indian cricket 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.