Join us  

बिग बी... अमिताभ बच्चन यांनी दिल्या बांगलादेशच्या क्रिकेटपटूंना ' या ' शुभेच्छा

दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांनी हा सामना पाहिला आणि तेदेखील या विजयाने भारावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 3:32 PM

Open in App
ठळक मुद्देहा सामना संपल्यावर बीग बी यांनी बांगलादेशच्या संघाचे कौतुक केले आणि त्यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छाही दिल्या.

मुंबई : श्रीलंकेत सुरु असलेल्या निदाहास ट्रॉफी ट्वेन्टी-20 स्पर्धेत बांगलादेशने यजमानांनी थरारक विजय मिळवला. या सामन्याच्या अखेरच्या षटकात आणि विजयानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी जे काही कृत्य केलं, ते खेळभावनेला साजेसं नव्हतं. पण तरीही त्यांचा हा विजय दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण दस्तुरखुद्द बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी हा सामना पाहिला आणि तेदेखील या विजयाने भारावले.

हा सामना संपल्यावर बीग बी यांनी बांगलादेशच्या संघाचे कौतुक केले आणि त्यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छाही दिल्या. ते म्हणाले की, " बांगलादेशचा हा शानदान विजय आहे. त्यांच्या खेळाडूने दिमाखदार खेळ केला. या सामन्यात सारं काही होतं. भावना होत्या, वाद-विवाद होते, जिंकण्याची इर्षा होती. अखेरच्या षटकात विजय मिळवणे सोपा नसतो. अंतिम फेरीत पोहोचलेल्या बांगलादेशच्या संघाचे अभिनंदन."

सामन्याच्या शेवटच्या षटकात जे नाट्य घडलं ते काही चाह्त्यांच्या पचनी पडलेले नाही. अखेरच्या षटकाच्या  दुसऱ्या चेंडूवर बांगलादेशचा मेहदी हसन धावबाद झाला. हा चेंडू षटकातील दुसरा बाउन्सर असतानाही पंचांनी नो-बॉल का दिला नाही, असा आक्षेप घेत बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसननं हुज्जत घातली. त्यानं आपल्या फलंदाजांना सामना सोडून माघारी यायला सांगितलं. त्यामुळे पाच मिनिटं खेळ थांबला. सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी हा वाद मिटवला. त्याचवेळी, बांगलादेशचे फलंदाज मैदानावर गेले नाहीत, तर संघ अपात्र ठरेल आणि श्रीलंका अंतिम फेरीत जाईल, याची जाणीव बांगलादेशचे व्यवस्थापक खालिद महमूद यांनी यांनी करून दिली. त्यामुळे सामना पुन्हा सुरू झाला आणि बांगलादेशने थरारक विजय मिळवला. 

टॅग्स :अमिताभ बच्चननिदाहास ट्रॉफी २०१८