Join us

भिवंडीत बेकायदा कारखाने सुरू, नियम धाब्यावर

मुंबईतील कमला मिलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या परवान्याचा व ना हरकत दाखल्याचा विषय ऐरणीवर आला. मात्र भिवंडीत आजही अनेक व्यवसाय व औद्योगिक कारखाने अग्निशमन दलाच्या ना हरकत परवान्याविना बिनदास्त सुरू आहे. याकडे अधिका-यांचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 06:34 IST

Open in App

भिवंडी - मुंबईतील कमला मिलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या परवान्याचा व ना हरकत दाखल्याचा विषय ऐरणीवर आला. मात्र भिवंडीत आजही अनेक व्यवसाय व औद्योगिक कारखाने अग्निशमन दलाच्या ना हरकत परवान्याविना बिनदास्त सुरू आहे. याकडे अधिका-यांचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शहरातील धामणकरनाका, कणेरी, वंजारपाटीनाका, दर्गारोड, भंडारी कंपाउंड, कल्याणरोड, नागाव, नारपोली या ठिकाणी मोठ्या संख्येने डार्इंग व सायझिंग कारखाने आहेत. या दोन्ही इंडस्ट्रीत कापडावर व धाग्यांवर प्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया करण्यासाठी बॉयलरचा उपयोग केला जातो. बॉयलरचे पाणी गरम करण्याकरिता लाकडांच्या भट्ट्या सुरू असतात. अशा स्थितीत शहरात अनेकवेळा डार्इंग व सायझिंगचे बॉयलर फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच या कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे आग लागून परिसरातील नागरी वस्तीला धोका निर्माण झाला आहे. कंपन्यांमध्ये आग लागल्यानंतर प्राथमिक उपाय म्हणून आग प्रतिबंधक साधने ठेवली जात नाहीत. त्यामुळे आग भडकल्याने अग्निशमन दलावर अवलंबून रहावे लागते.अग्निशमन दलाचे घटनास्थळापर्यंत पोहचेपर्यंत उशीर होते. अग्निशमन दलाच्या अधिकाºयांनी सायझिंग व डार्इंग मालकांना दाखला घेण्यास व आग प्रतिबंधक साधने ठेवण्यासाठी प्रवृत्त केलेले नाही.साळवींवर कारवाईची मागणीशहरातील अनेक कंपन्यांना अग्निशमन दलाकडून ना हरकत दाखला देण्यात आलेला नाही, असे दलाचे प्रमुख दत्ता साळवी यांनी माहिती अधिकारातून दिलेल्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे.याची दखल घेत आयुक्त योगेश म्हसे यांनी अग्निशमन दलाने अशा कंपन्यांवर आजतागायत कारवाई का केली नाही? याचा जाब विचारून साळवी यांच्यावर कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.

टॅग्स :ठाणे