दुबई : भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाने आयसीसी महिला टी२० रँकिंगमध्ये तीन स्थानां झेप घेत कारकिर्दीत सर्वोत्तम तिसरे स्थान पटकावले आहे.
हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्ध टी२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व मानधनाने केले. तीने तीन सामन्यात ७२ धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात अर्धशतकही ठोकले होते. दुखापतीमुळे मालिकेत खेळु न शकलेल्या हरमनप्रीतचे दोन स्थानांचे नुकसान झाले आहे. गोलंदाजांमध्ये राधा यादव हीने पाच स्थानांनी आघाडी घेतली. ती पाचव्या स्थानावर आहे. दोन सामन्यात तीन गडी बाद केले. फिरकी गोलंदाज एकता बिष्ट ही ५६ व्या स्थानावर आहे.
इंग्लंडच्या डॅनियल वॅटनेही आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान पटकावताना १७व्या स्थानावर कब्जा केला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत तिने १२३ धावा फटकावत इंग्लंडच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. सांघिक क्रमवारीमध्ये इंग्लंड पहिल्या, तर न्यूझीलंड दुसºया स्थानावर आहे. (वृत्तसंस्था)