Join us  

#BestOf2017 : भारतानं पाकिस्तानचा तो विक्रम काढला मोडीत...

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी संयमी खेळ करत विजय संपादन केला. या विजयासह 2017 वर्षाचा शेवट भारतीय संघाने गोड केला आहे

By namdeo.kumbhar | Published: December 25, 2017 7:16 AM

Open in App

मुंबई -  मुंबईच्या वानखेडे मैदानात अखेरच्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर मात करत मालिका 3-0 च्या फरकाने जिंकली. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी संयमी खेळ करत विजय संपादन केला. या विजयासह 2017 वर्षाचा शेवट भारतीय संघाने गोड केला आहे. हे वर्ष भारतीय संघासाठी लाभदायी ठरले आहे. यावर्षभरात भारतीय संघानं अनेक विक्रम आपल्या नावे केलं.

2017 वर्षभरात खेळलेल्या सर्वच 14 द्विपक्षीय मालिकेत भारतानं विजय मिळवला आहे. टी-20 मालिकेत विजय मिळवताच भारतानं पाकिस्तानचा वर्षभरात सर्वाधिक मालिका जिंकण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. 2011मध्ये पाकिस्तान संघानं 13 मालिका विजय मिळवले होते. भारतानं 2017 मध्ये चार कसोटी, सहा वन-डे आणि चार टी-20 मालिकेत विजय मिळवला आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मानं भारतीय संघाचे नेतृत्व केलं. 2018 च्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेबरोबर दोन हात करणार आहे. त्यामुळे होम ग्राऊंडवर मिळवलेला विजयी सिलसिला परदेशात कायम राखणार का? हा प्रश्न क्रीडारसिकांना पडलेला असेल. 

 2017 तील भारताचे कसोटी मालिका विजय - 

  1.  बांगलादेशविरोधात एकमेव कसोटी मालिका भारतानं जिंकली होती. 
  2. ऑस्ट्रेलियाविरोधातील चार कसोटी सामन्याची मालिका भारतानं 2-1नं जिंकली.
  3. श्रीलंकेमध्ये ऑगस्टमध्ये भारतानं तीन कसोटी सामन्याती मालिका 3-0नं जिंकली. 
  4. भारतात झालेली तीन सामन्याची कसोटी मालिकाही भारतानं जिंकली. 

2017तील भारताचे वन-डे मालिका विजय - 

  1. इंग्लंडविरोधात तीन सामन्याच्या मालिकेत 2-1नं विजय
  2. वेस्टइंडीज विरोधातील पाच सामन्याती मालिका 3-1नं जिंकली. 
  3. ऑगस्टमध्ये विराटसेनेनं 5-0नं लंकादहन केलं. 
  4. पाच सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा  4-1नं पराभव केला.
  5. न्यूझीलंडचा 2-1नं पराभव केला.
  6. वर्षाच्या शेवटी लंकेचा 2-1नं पराभव

2017तील भारताचे  टी-20 मालिका विजय - 

  1. इंग्लंडचा 2-1नं फडशा पाडला
  2. लंकेचा 1-0नं पराभव केला. 
  3. न्यूझीलंडचा 2-1नं पराभव.
  4. वर्षाखेरीस लंकेचा 3-0नं फडशा पाडला.  
टॅग्स :बेस्ट ऑफ 2017क्रिकेटभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयपाकिस्तान