Join us  

बेन स्टोक्स ‘विस्डेन’चा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू

क्रिकेटपटू कोहलीला टाकले मागे : ‘विस्डेन लिडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड’ पुरस्कार जिंकला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 5:04 AM

Open in App

लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने भारताचा कर्णधार विराट कोहली याचे मागील तीन-चार वर्षांपासून सुरू असलेले वर्चस्व मोडीत काढून बुधवारी २०१९ चा विस्डेनचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा (विस्डेन लिडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड) पुरस्कार पटकावला आहे.विस्डेन क्रिकेटर्स २०२० ने २०१९ मधील कामगिरीसाठी स्टोक्सला हा सन्मान बहाल केला. याआधी सलग तीन वर्षे (२०१६ ते २०१८) हा पुरस्कार कोहलीने जिंकला होता. हा एक विक्रम आहे. यंदा मात्र विस्डेनच्या पुरस्कार यादीत एकाही भारतीय पुरुष किंवा महिला खेळाडूचे नाव नाही.२००३ ला हा पुरस्कार सुरू झाल्यापासून इंग्लंडच्या खेळाडूने पुरस्कार पटकाविण्याचीकेवळ दुसरी वेळ आहे. २००५ ला अ‍ॅन्ड्र्यू फ्लिन्टॉप याची या पुरस्कारासाठी निवड झाली होती.आॅस्ट्रेलियाची अ‍ॅलिस पेरी सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ठरली. या यादीत आॅस्ट्रेलियाचे आणखी दोन खेळाडू आहेत.आॅस्ट्रेलियाच्या पुरुष संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि फलंदाज मार्श लाबुशेन, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि द. आफ्रिकेचा सिमोन हार्मर यांचा समावेश आहे. वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल याला टी २० चा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले.पेरीने याआधी २०१६ ला विस्डेनचा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार जिंकला होता. तिच्यासह एकूण सात महिला खेळाडूंनी हा पुरस्कार जिंकला असून यादीत दोनदा स्थान मिळविणारी पहिली विदेशी खेळाडू ठरली. अ‍ॅलिस पेरीने अ‍ॅशेसमध्ये याआधी कधीही घडली नसेल अशा कामगिरीची नोंद केली. तिने शानदार गोलंदाजी करीत २२ धावात ७ गडी बाद केले. टॉटनमधील कसोटी सामन्यात ११६ तसेच नाबाद ७६ धावा ठोकल्या, असे विस्डेनने म्हटले. (वृत्तसंस्था)‘ती’ सुपर ओव्हर महत्त्वाचीविस्डेनने म्हटले,‘बेन स्टोक्स याने काही आठवड्यातच दोनदा शानदार कामगिरी बजावली. त्याने विश्वचषकात अप्रतिम कामगिरी करीत इंग्लंडला जेतेपदाचा मान मिळवून दिला. सुपर ओव्हरमध्ये त्याने १५ धावा ठोकल्या. हेडिंग्ले कसोटीत नाबाद १३५ धावा ठोकून इंग्लंडला एका गड्याने विजय मिळवून दिला होता.’स्टोक्सने गतवर्षी इंग्लंडला पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. याशिवाय त्याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध हेडिंग्ले येथे ऐतिहासिक खेळी करीत इंग्लंडला अ‍ॅशेसमध्ये विजयी केले होते.

टॅग्स :इंग्लंड