Join us  

बेन स्टोक्स काही अंशी विराटप्रमाणे, नासिर हुसेनचे मत

सर्वसाधारणपणे बेन स्टोक्सचे निर्णय कोहलीच्या निर्णयाशी मिळतेजुळते आहेत. त्यामुळे तो शानदार कर्णधार सिद्ध होईल, असे मला वाटते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 2:30 AM

Open in App

मुंबई : इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने बेन स्टोक्सच्या नेतृत्वक्षमतेची तुलना विराट कोहलीसोबत केली आहे. हुसेन म्हणाला, हा अष्टपैलू रुटच्या अनुपस्थितीत ८ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध साऊथम्पटनमध्ये सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व सांभाळेल. त्यावेळी तो ‘शानदार कर्णधार सिद्ध होऊ शकतो. विश्वकप स्पर्धेत इंग्लंडच्या विजयाचा ‘हीरो’ स्टोक्सची वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी कर्णधार म्हणून नियुक्ती झाली. रूटने दुसऱ्या मुलांच्या जन्मासाठी सुटी घेतली असून तो पत्नीसोबत आहे.स्टार स्पोर्ट््सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ कार्यक्रमात बोलताना हुसेन म्हणाला,‘सर्वसाधारणपणे बेन स्टोक्सचे निर्णय कोहलीच्या निर्णयाशी मिळतेजुळते आहेत. त्यामुळे तो शानदार कर्णधार सिद्ध होईल, असे मला वाटते.’हुसेन पुढे म्हणाला,‘सध्याच स्टोक्सला पूर्णकालीन कर्णधारपद सोपविण्याचे मी समर्थन करणार नाही. एक अष्टपैलू म्हणून स्टोक्सवर बरीच जबाबदारी आहे. तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळतो. पण त्याला कमी लेखता येणार नाही.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :बेन स्टोक्सइंग्लंडविराट कोहलीआंतरराष्ट्रीय क्रिकेट