बेन स्टोक्सच्या आयुष्यातील 'ट्रॅजेडी' मन अस्वस्थ करेल; कुटुंबात घडली होती भीषण घटना!

बेन स्टोक्सच्या आयुष्यातील हा भूतकाळ कोणालाच माहित नव्हता...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 03:50 PM2019-09-17T15:50:05+5:302019-09-17T15:50:57+5:30

whatsapp join usJoin us
Ben Stokes' half-brother and sister were shot dead by their father | बेन स्टोक्सच्या आयुष्यातील 'ट्रॅजेडी' मन अस्वस्थ करेल; कुटुंबात घडली होती भीषण घटना!

बेन स्टोक्सच्या आयुष्यातील 'ट्रॅजेडी' मन अस्वस्थ करेल; कुटुंबात घडली होती भीषण घटना!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

किंग्स्टन : वर्ल्ड कप विजयाचा नायक, अॅशेस मालिकेतील तारणहार बेन स्टोक्सने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इंग्लंड संघाला अविस्वसनीय विजय मिळवून दिले आहेत. इंग्लंडला पहिलावहिला वन डे वर्ल्ड कप जिंकून देण्यात स्टोक्सचा सिंहाचा वाटा आहे. शिवाय नुकत्याच पार पडलेल्या अॅशेस मालिकेत त्यानं एकहाती खिंड लढवत इंग्लंडला तिसऱ्या कसोटीत अश्यक्यप्राय विजय मिळवून दिला होता. त्यामुळेच इंग्लंडला मालिका बरोबरीत सोडवता आली. स्टोक्स आता इंग्लंड संघासाठी आणि तेथील क्रिकेट फॅन्ससाठी मोठा सेलेब्रिटीच आहे. यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या स्टोक्सच्या आयुष्यात सर्वकाही आनंदी आनंद आहे, परंतु भूतकाळात त्याच्या आयुष्यात अशी एक ट्रॅजेडी घडली आहे की ती ऐकताच आपलं मन अस्वस्थ होते.

बेन स्टोक्सचा मुळचा जन्म हा न्यूझीलंडचा..  इंग्लंडने वन डे वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी त्याच्या घरी कही खुशी कही गम असे वातावरण होते. कारण, ज्या देशात त्याच्या जन्म झाला त्याच देशाला त्यानं पराभूत केले होते. स्टोक्सच्या आयुष्यातील मनाला चटका लावणारी घटना घडलीय ती न्यूझीलंडमध्येच. SUN या वृत्तपत्राकडे दिलेल्या मुलाखतीत स्टोक्सच्या आईनं हा प्रसंग सांगितला अन् काळजाचा ठोकाच चुकला..


बेनच्या जन्माच्या तीन वर्षांपूर्वी त्याच्या सावत्र भाऊ व बहिणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. The Sun ने मंगळवारी हे वृत्त प्रसिद्ध केले अन् जगाला धक्काच बसला. मारेकरी रिचर्ड डन हा बेनची आई डेबचा पहिला पती आहे आणि त्याने मत्सर भावनेतून आठ वर्षीय ट्रेसी आणि चार वर्षीय अँड्य्रू यांची एप्रिल 1988 मध्ये गोळ्या घालून हत्या केली.''डनकडे आठवडाभरासाठी त्या मुलांची कस्टडी देण्यात आली होती आणि त्यावेळी त्यानं हे कृत्य केले. त्यानंतर त्यानं स्वतःलाही संपवले,'' असे त्या वृत्तपत्रात नमुद केले आहे.


डेबनं याआधी हा प्रसंग जगजाहीर केला नव्हता. डेबनं न्यूझीलंडचे माजी रग्बी प्रशिक्षक गेरार्ड स्टोक्स यांच्याशी लग्न केले आणि बेन हा त्यांचा मुलगा आहे. रिचर्डने ज्यावेळी हे कृत्य केले तेव्हा त्याच्याकडे जॉब नव्हता आणि डेबशी काडीमोड झाला होता. त्यामुळे रिचर्ड नैराश्येच्या गर्तेत सापडला होता. बेन 12 वर्षांच्या असताना स्टोक्स कुटुंबीयांनी लंडनमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 


दरम्यान, The Sun मध्ये छापून आलेल्या या वृत्तावर बेनने तीव्र शब्दात नाराजी प्रकट केली आहे. 

Web Title: Ben Stokes' half-brother and sister were shot dead by their father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.