Join us  

‘ओव्हर थ्रो’च्या चार धावा न देण्याची स्टोक्सने पंचांना केली होती विनंती

बेन स्टोक्स याने रविवारी झालेल्या अंतिम सामन्याच्यावेळी ओव्हर थ्रोच्या चार धावा संघाच्या खात्यात न जोडण्याची विनंती केली होती, असा दावा स्टोक्सचा कसोटी संघातील सहकारी जेम्स अँडरसन याने बुधवारी केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:18 AM

Open in App

लंडन, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : न्यूझीलंडवरील सर्वाधिक चौकारांच्या साहाय्याने मिळविलेल्या विश्वचषक विजयात हिरो ठरलेला इंग्लंडचा फलंदाज बेन स्टोक्स याने रविवारी झालेल्या अंतिम सामन्याच्यावेळी ओव्हर थ्रोच्या चार धावा संघाच्या खात्यात न जोडण्याची विनंती केली होती, असा दावा स्टोक्सचा कसोटी संघातील सहकारी जेम्स अँडरसन याने बुधवारी केला. याच धावा अखेर निर्णायक ठरल्या.न्यूझीलंडचा क्षेत्ररक्षक मार्टिन गुप्टिलचा थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागल्यानंतर चेंडू सीमापार गेला होता. त्यावेळी स्टोक्स दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नांत होता. धावून काढलेल्या दोन धावा आणि ओव्हर थ्रो च्या चार अशा सहा धावा स्टोक्सला मिळाल्या. काही तज्ज्ञांच्या मते पाच धावा द्यायला हव्या होत्या.अँडरसन म्हणाला, ‘अष्टपैलू स्टोक्सने ओव्हर थ्रो होताच हात उंचावून माफी मागितली होती. त्याने लगेचच पंचांना निर्णय फिरविण्याची देखील विनंती केली होती. क्रिकेटचा शिष्टाचार असा की चेंडू यष्टीच्या दिशेने फेकण्यात आल्यास, तो कुणाला लागल्यास अथवा बॅटवर आदळून सीमापार जात असेल, तर त्यावर धाव न घेतलेली बरी. हा चेंडू सीमापार झाल्यास पंच चौकार देऊ शकतात. नियमानुसार चौकार असल्याने त्यावर कुणीही आक्षेप नोंदवू शकत नाही.’स्टोक्स पंचांजवळ गेला होता. त्याने दोन्ही पंचांना विनंती केली की, त्तुम्ही हा चौकार काढून घेऊ शकता. आम्हाला या धावा नको आहेत. पण तो नियम असल्याने धावा मागे घेण्याचा अधिकार पंचांना नाही.’

पराभव नम्रपणे स्वीकारल्याने शास्त्रींकडून विलियम्सनचे कौतुकविश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडकडून चौकारांच्या आधारे पराभूत झालेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने नम्रपणे पराभव स्वीकार केला. त्याच्या या विनम्रपणाचे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कौतुक केले आहे.शास्त्री यांनी केलेल्या टिष्ट्वटमध्ये, ‘आपला नम्रपणा आणि पराभवाचा स्वीकारण्याची वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. गेल्या ४८ तासात तुझे जे वक्तव्य आले ते पाहून या खेळाची प्रतिष्ठा उंचावल्याची खात्री पटली आहे. तुझ्या या वृत्तीला सलाम...! यू जस्ट नॉट केन, यू केन अ‍ॅन्ड एबल...!’

टॅग्स :बेन स्टोक्सइंग्लंडवर्ल्ड कप 2019