Join us  

१२ षटकार, १० चौकार! ८४ चेंडूंत चोपल्या १५७ धावा; ७व्या क्रमांकावर आलेल्या इंग्लिश फलंदाजाची मेहनत गेली वाया

३४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना निम्मा संघ १२० धावांवर तंबूत परतला होता... आता विजयाची काहीच आशा उरलेली नसताना ७व्या क्रमांकावर कर्णधार फलंदाजीला आला अन्

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 5:43 PM

Open in App

३४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना निम्मा संघ १२० धावांवर तंबूत परतला होता... आता विजयाची काहीच आशा उरलेली नसताना ७व्या क्रमांकावर कर्णधार फलंदाजीला आला अन् वादळी फटकेबाजी करून ३३३ धावांपर्यंत धावा घेऊन गेला... अखेरच्या ५ चेंडूंत विजयासाठी १० धावांची गरज असताना त्याची विकेट पडली अन् केलेली सर्व मेहनत वाया गेली... 

 

Royal London One-Day Cup स्पर्धेतील या थरारक लढतीने सर्वांचे लक्ष वेधले.. डरहॅमने प्रथम फलंदाजी करताना  ४९.२ षटकांत ३४२ धावा केल्या. ग्रॅहम क्लार्क ( ८६), कर्णधार स्कॉट बोर्थविक ( ८८), लिएम ट्रेव्हस्कीस ( ४४) यांनी दमदार खेळ करून डरहॅमला ३४२ धावांचा डोंगर उभा करून दिला. सोमरसेटच्या सोनी बाकेरने ४६ धावांत ६ विकेट्स घेतल्या. बेन ग्रीनने दोन विकेट्स घेतल्या. ३४३ धावांच्या लक्ष्याच पाठलाग करताना सोमरसेटच्या ५ विकेट्स १२० धावांत तंबूत परतला होता. मॅट रेनशॉ ( २३), स्टीव्हन डेव्हिस (९), जेम्स हिलडर्थ ( १२), जॉर्ज बार्थलेट ( ३४) व लुईस गोल्डवर्थी ( २७) यांना डरहॅमच्या ख्रिस रशवर्थ, ऑलिव्हर गिब्सन, स्टॅनली मॅकएलिडन व स्कॉट बोर्थविक यांनी माघारी पाठवले. रशवर्थ व गिब्सन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

 

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार बेन ग्रीनने जेम्स रेवसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु रेव २४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर ग्रीनने एकाकी खिंड लढवली. त्याने ८४ चेंडूंत १५७ धावांची वादळी खेळी केली. त्यात १० चौकार व १२ षटकारांचा समावेश होता. ६ चेंडूंत विजयासाठी ११ धावांची गरज असताना सोनी बाकेरने एक धाव करून ग्रीनला स्ट्राईक दिली. पण, दुसऱ्याच चेंडूवर ग्रीनला बाद करून गिब्सनने डरहॅमला ९ धावांनी विजय मिळवून दिला.

टॅग्स :इंग्लंड
Open in App