कोलकाता : पावसाचा व्यत्यय आलेल्या पहिल्या कसोटीत भारताला सुरुवातीलाच जोरदार धक्के देणाºया श्रीलंकन संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक रुमेश रत्नायके यांनी ही तर फक्त सुरुवात आहे आणि अजून खूप काम करणे बाकी असल्याचे म्हटले आहे.
रत्नायके म्हणाले, ‘जेव्हा आम्ही येथे आलो तेव्हा आमच्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. त्यामुळे आमचे खेळाडू आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहेत. प्रदीर्घ काळानंतर मी इतकी चांगली सुरुवात पाहिली. खेळपट्टीतून मदत मिळत आहे. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी पोषक आहे हे आम्हाला माहीत आहे; परंतु अद्याप काम पूर्ण झाले नाही. ही तर फक्त सुरुवात आहे.’
ते म्हणाले, ‘निश्चितच नाणेफेक जिंकणे चांगले ठरले. पुढील एक अथवा दीड दिवसांपर्यंत खेळपट्टीकडून मदत मिळेल. खेळपट्टीवर गवत आहे आणि ही आश्चर्यकारक होते.’ लकमल धारदार गोलंदाजी करीत असताना त्याला दुसरीकडून साथ मिळू शकली नाही. लाहिरू गमागे हा भारतीय फलंदाजांवर दबाव ठेवण्यात यशस्वी ठरू शकला नाही.