कराची : पाकिस्तानसोबत खेळण्याच्या प्रस्तावाला भारतीय क्रिकेट बोर्डाने नकार दिलेला नाही तसेच हा प्रस्ताव स्वीकारलेलादेखील नाही, बीसीसीआयने आॅकलंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या बैठकीत द्विपक्षीय मालिकेसोबत १९ सामने खेळण्यास नकार दिलेला नाही, तसेच हा प्रस्ताव स्वीकारलेलादेखील नाही, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी सांगितले.
पाकिस्तान आणि भारताला नव्या एफटीपीनुसार १९ सामने खेळायचे आहेत. जे आयसीसीच्या शिफारशींनुसार २०१९ पासून चार वर्षे लागू राहतील. सेठी यांनी मीडियाला सांगितले की, ‘आयसीसीने २०१९-२०२३ दरम्यान सर्व कसोटी क्रिकेट खेळणाºया देशांना एफटीपी सुरू करण्यात आला आहे.
त्यात भारत आणि पाकिस्तान यांचादेखील समावेश आहे. बीसीसीआयने प्रस्तावित एफटीपीला मान्यता दिली नाही. तसेच हा प्रस्ताव फेटाळलेला नाही.’
त्यांनी सांगितले, की पाकने या प्रस्तावित एफटीपीवर आक्षेप घेतला आहे. आयसीसीने ४ वर्षांत दोन्ही देशांत तेवढेच सामने घ्यावे जेवढे सामने २०१४ च्या दोन्ही बोर्डांत झालेल्या बैठकीत सहमती झाली आहे.
आम्हाला विश्वास आहे, की भारताची अखेरीस हीच इच्छा असेल, की आयसीसी दोन्ही देशांतील सामने होण्यासाठी एफटीपीमध्ये सरकारच्या मान्यतेचा नियम तयार करेल. मात्र आॅकलंडच्या बैठकीत त्यांनी प्रस्तावित १९ सामन्यांना मंजुरी दिलेली नाही. पाकिस्तानने आयसीसीला स्पष्ट केले आहे, की बीसीसीायने आपल्या त्या जबाबदाºया पाळाव्यात. ज्यांचा उल्लेख एमओयुमध्ये करण्यात आला आहे. - नजम सेठी