Join us  

आयपीएल आयोजनासाठी बीसीसीआयची महत्त्वपूर्ण बैठक आज; २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान यूएईमध्ये होऊ शकते स्पर्धा

या बैठकीत आयपीएल आयोजनाचा मुख्य मुद्दा असेल. त्याचप्रमाणे, देशांतर्गत क्रिकेट मोसमावरही चर्चा होईल. मात्र देशात कोरोनाची स्थिती बिकट असल्याने यामध्ये काही प्रमाणात कपात करण्याचीही शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 12:26 AM

Open in App

नवी दिल्ली : दुबईमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे सराव शिबिर आयोजित करण्याच्या हालचालींना वेग येत असताना शुक्रवारी होणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आॅनलाईन बैठकीत काय निर्णय घेण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार यंदाची आयपीएल संयुक्त अरब अमिरातीत होणार असून २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळविण्याची बीसीसीआयची योजना आहे.या बैठकीत आयपीएल आयोजनाचा मुख्य मुद्दा असेल. त्याचप्रमाणे, देशांतर्गत क्रिकेट मोसमावरही चर्चा होईल. मात्र देशात कोरोनाची स्थिती बिकट असल्याने यामध्ये काही प्रमाणात कपात करण्याचीही शक्यता आहे. भारताच्या पुरुष संघाच्या भविष्यातील दौºयाच्या कार्यक्रमाबाबतही (एफटीपी) गंभीर चर्चा यावेळी होईल. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, ‘सर्व पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे. आयपीएलसाठी पहिली पसंती भारतालाच असेल. पुढील आठवड्यात आयसीसीने टी२० विश्वचषकबाबत निर्णय घेतला, तर आम्ही पुढील निर्णय घेऊ.’- बीसीसीआयसाठी यंदाच्या मोसमात देशांतर्गत क्रिकेटचे वेळापत्रक ठरविणे अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. वरिष्ठ पुरुष-महिला, २३ वर्षांखालील पुरुष-महिला, ज्युनिअर मुले-मुली अशा गटांमध्ये वर्षभरात हजाराहून अधिक सामने होतात. बीसीसीआयच्या एका अधिकाºयाने सांगितले की, ‘नक्कीच यंदा रणजी चषक स्पर्धेच्या कार्यक्रमात बदल करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे, विजय हजारे, दुलीप चषक, सय्यद मुश्ताक अली या स्पर्धांचे सलग आयोजन करणे शक्य आहे का, यावरही चर्चा करण्याची गरज आहे. सध्या खूप वेळ वाया गेला असल्याने यापैकी कोणती तरी एक स्पर्धा रद्द करण्यात येऊ शकते.’- आयसीसी स्पर्धांसाठी असलेल्या करामधून सूट मिळवणे विवादास्पद ठरत आहे. यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक मंजुरी मिळवण्यासाठी बीसीसीआयला डिसेंबरपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. भारताच्या ‘एफटीपी’बाबत म्हणायचे झाल्यास, सप्टेंबरमधील मर्यादित षटकांचा भारत दौरा याआधीच इंग्लंडने रद्द केला आहे. या मालिकेचे आयोजन कसोटी मालिकेनंतर फेब्रुवारीमध्ये होऊ शकते. जर बीसीसीआयला या मालिकेदरम्यान मर्यादित षटकांची मालिकाही खेळवायची असेल, तर ५ कसोटी सामन्यांची मालिका कमी करून त्याऐवजी प्रत्येकी ३ सामन्यांची एकदिवसीय व टी-२० मालिका खेळविली जाऊ शकते. त्याचप्रमाणे श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौºयाबाबतही पुन्हा निर्णय घेण्यात येऊ शकतो.

आयपीएल आयोजनासाठी बीसीसीआयची महत्त्वपूर्ण बैठक आज; २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान यूएईमध्ये होऊ शकते स्पर्धानवी दिल्ली : दुबईमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे सराव शिबिर आयोजित करण्याच्या हालचालींना वेग येत असताना शुक्रवारी होणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आॅनलाईन बैठकीत काय निर्णय घेण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार यंदाची आयपीएल संयुक्त अरब अमिरातीत होणार असून २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळविण्याची बीसीसीआयची योजना आहे.या बैठकीत आयपीएल आयोजनाचा मुख्य मुद्दा असेल. त्याचप्रमाणे, देशांतर्गत क्रिकेट मोसमावरही चर्चा होईल. मात्र देशात कोरोनाची स्थिती बिकट असल्याने यामध्ये काही प्रमाणात कपात करण्याचीही शक्यता आहे. भारताच्या पुरुष संघाच्या भविष्यातील दौºयाच्या कार्यक्रमाबाबतही (एफटीपी) गंभीर चर्चा यावेळी होईल. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, ‘सर्व पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे. आयपीएलसाठी पहिली पसंती भारतालाच असेल. पुढील आठवड्यात आयसीसीने टी२० विश्वचषकबाबत निर्णय घेतला, तर आम्ही पुढील निर्णय घेऊ.’- बीसीसीआयसाठी यंदाच्या मोसमात देशांतर्गत क्रिकेटचे वेळापत्रक ठरविणे अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. वरिष्ठ पुरुष-महिला, २३ वर्षांखालील पुरुष-महिला, ज्युनिअर मुले-मुली अशा गटांमध्ये वर्षभरात हजाराहून अधिक सामने होतात. बीसीसीआयच्या एका अधिकाºयाने सांगितले की, ‘नक्कीच यंदा रणजी चषक स्पर्धेच्या कार्यक्रमात बदल करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे, विजय हजारे, दुलीप चषक, सय्यद मुश्ताक अली या स्पर्धांचे सलग आयोजन करणे शक्य आहे का, यावरही चर्चा करण्याची गरज आहे. सध्या खूप वेळ वाया गेला असल्याने यापैकी कोणती तरी एक स्पर्धा रद्द करण्यात येऊ शकते.’- आयसीसी स्पर्धांसाठी असलेल्या करामधून सूट मिळवणे विवादास्पद ठरत आहे. यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक मंजुरी मिळवण्यासाठी बीसीसीआयला डिसेंबरपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. भारताच्या ‘एफटीपी’बाबत म्हणायचे झाल्यास, सप्टेंबरमधील मर्यादित षटकांचा भारत दौरा याआधीच इंग्लंडने रद्द केला आहे. या मालिकेचे आयोजन कसोटी मालिकेनंतर फेब्रुवारीमध्ये होऊ शकते. जर बीसीसीआयला या मालिकेदरम्यान मर्यादित षटकांची मालिकाही खेळवायची असेल, तर ५ कसोटी सामन्यांची मालिका कमी करून त्याऐवजी प्रत्येकी ३ सामन्यांची एकदिवसीय व टी-२० मालिका खेळविली जाऊ शकते. त्याचप्रमाणे श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौºयाबाबतही पुन्हा निर्णय घेण्यात येऊ शकतो.

टॅग्स :आयपीएल