Join us

BCCI प्रसारण हक्काची बोली ६ हजार कोटींच्या वर

भारतात पुढील पाच वर्षांत (२०१८-२०२३) होणाऱ्या द्विपक्षीय मालिकांच्या प्रसारण हक्कांची बोली एक अब्ज डॉलरजवळ पोहचली आहे. स्टार आणि सोनी या प्रसारण कंपन्यांच्या सोबतच जियोने बोली लावली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:47 IST

Open in App

नवी दिल्ली/मुंबई - भारतात पुढील पाच वर्षांत (२०१८-२०२३) होणाऱ्या द्विपक्षीय मालिकांच्या प्रसारण हक्कांची बोली एक अब्ज डॉलरजवळ पोहचली आहे. स्टार आणि सोनी या प्रसारण कंपन्यांच्या सोबतच जियोने बोली लावली आहे. आतापर्यंत ६ हजार ३२ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे.वैश्विक समग्र अधिकार ज्यात भारत व बाहेरील प्रसारणासोबतच डिजीटल अधिकारही सामील आहेत. गेल्या वेळी २०१२मध्ये प्रसारण हक्क ३ हजार ८५२१ कोटी रुपयांत विकले गेले होते. दुसºया दिवशी बीसीसीआयचे प्रसारण हक्कात ५६ टक्के वाढ झाली आहे. त्यात प्रत्येक सामना जवळपास ६० कोटी रुपयांत गेला आहे. भारताला पुढच्या पाच वर्षांत तिन्ही प्रारुपात १०२ सामने खेळायचे आहेत.बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, ‘ही भारतीय क्रिकेटची ताकद आहे. संभाव्य बोली लावणाºयांना माहित आहे की, ‘भारतात फक्त एका खेळात गुंतवणूक केल्याने फायदा आहे. आम्हाला माहित नाही की सर्वात मोठी बोली कुणी लावली मात्र तिन्ही कंपन्या अजूनही शर्यतीत आहेत.’

टॅग्स :बीसीसीआयबातम्याक्रिकेट