Join us  

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट बोर्डावर नामुष्की, बीसीसीआयची वेबसाईट निघाली विक्रीला

वेबसाईटची नोंदणी करणारी रजिस्टरक़ॉम आणि नेमजेटक़ॉमने या डोमेन नावाला सार्वजनिक बोलीसाठी ठेवले आहे़

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2018 8:53 PM

Open in App

नवी दिल्ली: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ बीसीसीआय आपली अधिकृत वेबसाईट डब्ल्यू़ डब्ल्यू़ डब्ल्यू़ बीसीसीआय़ टीव्ही डोमेनचे नूतनीकरण न केल्याने आॅफलाईन झाली़. वेबसाईटची नोंदणी करणारी register.com आणि namejet.com ने या डोमेन नावाला सार्वजनिक बोलीसाठी ठेवले आहे़.  त्याला आतापर्यंत सात बोली मिळाल्या आहेत़. यामध्ये सर्वात मोठी बोली २७० डॉलरची आहे़. ही डोमेन २ फेबु्रवारी २००६ पासून २ फेबु्रवारी २०१९ पर्यंत वैध आहे़. याची अपडेट करण्याची तारीख ३ फेब्रुवारी २०१८ होती़. 

बीसीसीआयची वेबसाईट ही भारताच्या आणि देशांतर्गत सामन्यांचे स्कॉरबोर्ड बघण्यासाठी आणि बीसीसीआय बोर्डाच्या कामकाज आणि काही महत्वाच्या बातम्यांसाठी महत्वाची ठरत आहे. पण आता वेबसाईट बंद असल्याने बीसीसीआयसाठी समस्या उद्भवली आहे. त्यातच आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना होता आणि याच दिवशी वेबसाईट बंद आहे.

बीसीसीआयला आयसीसीकडून ४०५ मिलियन अमेरिकन डॉलर्स इतका महसूल मिळतो. तसेच सप्टेंबरमध्ये बीसीसीआयने २.५५ बिलियन अमेरिकन डॉलर्सला स्टार स्पोर्ट्सला आयपीएलचे मीडिया हक्क दिले आहेत असे असतानाही वेबसाईटचे नूतनीकरण करण्यात बीसीसीआय अपयशी ठरली आहे. विशेष म्हणजे हे डोमेन २०१०मध्ये आयपीएलचे अध्यक्ष ललित मोदी यांनी विकत घेतले होते. 

 

टॅग्स :बीसीसीआय