Join us  

Hardik Pandya : हार्दिक पांड्याचे टीम इंडियात परतणे अवघड; BCCI व निवड समितीनं त्याच्यासमोर ठेवली कठीण अट!

न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी निवडलेल्या संघात वेंकटेश अय्यर या अष्टपैलू खेळाडूला संधी देण्यात आली आहे. वेंकटेशच्या एन्ट्रीमुळे हार्दिकचे  दरवाजे बंद होतात की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 5:07 PM

Open in App

India Squad for NZ Series – Hardik Pandya: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर टीम इंडिया नवा कर्णधार व नवीन प्रशिक्षकासह जोरदार मुसंडी मारण्यासाठी सज्ज होत आहे. कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडचा ट्वेंटी-२० मालिकेत सामना करणार आहे. या मालिकेतून विराट कोहली. रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह यांनी विश्रांती घेतली आहे. तेच हार्दिक पांड्याला डच्चू देण्यात आलेला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हार्दिकच्या फिटनेसवरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तरीही विराटनं त्याला पाचही सामने खेळवले. पण, आता बीसीसीआय ही चूक सुधारत आहे आणि संघात कमबॅक करण्यासाठी हार्दिकसमोर त्यांनी अवघड अट ठेवली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी निवडलेल्या संघात वेंकटेश अय्यर या अष्टपैलू खेळाडूला संधी देण्यात आली आहे. कोलकाता नाइट रायडर्सकडून वेंकटेशनं आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात दमदार कामगिरी केली. फलंदाजी व गोलंदाजीत तो चमकला आणि टीम इंडियामध्ये अशाच अष्टपैलू खेळाडूची बीसीसीआयला गरज आहे. वेंकटेशच्या एन्ट्रीमुळे हार्दिकचे  दरवाजे बंद होतात की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. त्यात बीसीसीआय व निवड समितीनं हार्दिकला पुनरागमन करायचे असेल तर स्थानिक क्रिकेटमध्ये स्वतःचा फॉर्म व तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल, असा पवित्रा घेतला आहे.

''होय, हार्दिक पांड्याचा संघातून वगळले गेले. त्यामुळे आता पुन्हा संघ निवडीसाठी दावा सांगायचा असेल, तर त्याला स्वतःची तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल.  हार्दिकचा फक्त फलंदाज म्हणून आम्ही संघात समावेश करू शकत नाही. त्याला स्थानिक क्रिकेट खेळावं लागेल. त्याला टीम इंडियात कमबॅक करायचं असेल, तर स्वतःचा फॉर्म व तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल, ''असे निवड समितीच्या सदस्यानं inside.sports ला सांगितले. पुढील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आता केवळ वर्षभराचा कालावधी आहे आणि त्यात बीसीसीआय व निवड समितीला किमान ४-५ अष्टपैलू खेळाडू तयार करायचे आहेत. त्याची सुरूवात ही वेंकटेश अय्यरच्या निवडीतून झाली आहे.   

न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेला संघभारतीय संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल ( उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज ( India’s T20I squad: Rohit Sharma (Captain), KL Rahul (Vice-Captain), Ruturaj Gaikwad, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, Rishabh Pant (wicket-keeper), Ishan Kishan (wicket-keeper), Venkatesh Iyer, Yuzvendra Chahal, R Ashwin, Axar Patel, Avesh Khan, Bhuvneshwar Kumar, Deepak Chahar, Harshal Patel, Mohd. Siraj) 

टॅग्स :हार्दिक पांड्याभारत विरुद्ध न्यूझीलंडबीसीसीआय
Open in App