Join us  

सर्फराज खानला संघात निवडले तर..! बीसीसीआयकडून खुलासा, सांगितले त्याची निवड न होण्यामागचं कारण

IND vs AUS : भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेनंतर  ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 5:03 PM

Open in App

भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेनंतर  ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी यजमान भारतासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी नुकतीच  भारतीय संघाची घोषणा केली. पण, यात प्रथम श्रेणीत चांगली कामगिरी करणाऱ्या सर्फराज खान ( Sarfaraz Khan)ला कसोटी पदार्पणाची संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, तसे झाले नाही. निवड समितीने त्याला संघात स्थान दिले नाही.

महेंद्रसिंग धोनी वर्षभरात तीन देश फिरतो; जाणून घ्या संपूर्ण माहिती

संघात स्थान न मिळाल्याने सर्फराजच्या चाहत्यांनी बीसीसीआयला ट्रोल केले. जर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना संघात स्थान मिळू शकते, तर प्रथम श्रेणीतील रन मशीन सर्फराजला संधी का दिली जात नाही, असा सवाल चाहत्यांनी उपस्थित केला. अनेक आठवडे उलटल्यानंतर निवड समितीच्या सदस्याने सर्फराजची निवड न करण्यामागचे कारण उघड केले आहे.

निवडकर्ता श्रीधरन शरथने स्पोर्ट्स स्टारशी म्हटले की,“ विराट कोहली अजूनही मॅच विनर आहे. चेतेश्वर पुजाराने फलंदाजीत स्थिरता आणली. रोहित शर्मा एक उत्तम कर्णधार आणि उत्तम फलंदाज आहे. श्रेयस अय्यरने चांगली कामगिरी केली आहे. शुभमन गिल आणि केएल राहुलमध्ये चांगली फलंदाजी करण्याची क्षमता आहे. अशात सर्फराजला संघात कोठे स्थान द्यायचे हा प्रश्न आहे. तो बीसीसीआयच्या नजरेत आहे. वेळ आल्यावर त्याला संधी दिली जाईल. संघ निवडताना समतोल आणि संयोजनाकडे लक्ष दिले जाते.''

भारतीय कसोटी संघाची दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. पण, सर्फराजला पुढील दोन कसोटी सामन्यांमध्ये संधी दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे. भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. सर्फराजने ३७ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७९.८५च्या सरासरीने ३५०५ धावा केल्या आहेत. त्यात १३ शतकं व ९ अर्धशतकांचा समावेश असून नाबाद ३०१ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआय
Open in App