सध्याच्या स्थितीसाठी ‘बीसीसीआय’ जबाबदार, तेंडुलकरचे लोकपालला उत्तर

दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कथित हित जोपासण्याच्या मुद्यावर बीसीसीआयतर्फे ‘समाधानकार’असल्याचे उत्तर फेटाळून लावताना सध्याच्या स्थितीसाठी बीसीसीआय जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 03:00 AM2019-05-06T03:00:12+5:302019-05-06T03:01:31+5:30

whatsapp join usJoin us
 The BCCI is responsible for the current situation, the reply of Tendulkar to the Lokpal | सध्याच्या स्थितीसाठी ‘बीसीसीआय’ जबाबदार, तेंडुलकरचे लोकपालला उत्तर

सध्याच्या स्थितीसाठी ‘बीसीसीआय’ जबाबदार, तेंडुलकरचे लोकपालला उत्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कथित हित जोपासण्याच्या मुद्यावर बीसीसीआयतर्फे ‘समाधानकार’असल्याचे उत्तर फेटाळून लावताना सध्याच्या स्थितीसाठी बीसीसीआय जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

तेंडुलकरने या प्रकरणात बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांना १३ मुद्यावर आपले उत्तर दिले आहे. त्यात सचिनने निवेदन केले की, प्रशासकांच्या समितीचे (सीओए) प्रमुख विनोद राय व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना पाचारण करीत या प्रकरणावर त्यांनी मत मांडावे, असे म्हटले आहे.


तेंडुलकरने १०, ११ व्या आणि १२ व्या मुद्यामध्ये कडवी प्रतिक्रिया देताना लिहिले की, ‘कुठल्याही पक्षपाताशिवाय नोटीस मिळाल्यानंतर (तेंडुलकर) आश्चर्य वाटते. त्याला सीएसी सदस्य करण्याचा निर्णय बीसीसीआयचा होता. आता ते याला हित जोपासण्याचा मुद्दा असल्याचे म्हणत आहेत. नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तीला निवृत्तीनंतर (आयपीएलमधून) २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सचे आयकॉनपद बहाल करण्यात आले. हे पद सीएसी (२०१५) अस्तित्वात येण्यापूर्वीचे आहे.

दरम्यान, सचिनवर आरोप आहे की, तो क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्यपदासह मुंबई इंडियन्स आयकॉन असल्यामुळे दुहेरी भूमिका बजावत आहे. त्यात हितसंबंध जोपासण्याचा मुद्दा उपस्थित होतो.
सीएसीचे तीन सदस्य तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण तिघांनी आपली बाजू मांडताना हित जोपासण्याचा मुद्दा फेटाळून लावला आहे. तेंडुलकर
व लक्ष्मण यांना मध्य प्रदेश
क्रिकेट संघटनेचे (एमपीसीए) सदस्य संजीव गुप्ता यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर नोटीस बजावण्यात
आली आहे.

तिघांनीही मुद्दा फेटाळला

सचिन क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्यपदासह मुंबई इंडियन्स आयकॉन असल्यामुळे दुहेरी भूमिका बजावत आहे. त्यात हितसंबंध जोपासण्याचा मुद्दा उपस्थित होतो. सीएसीचे तीन सदस्य तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना बोर्डाचे लोकपाल व नैतिक अधिकारी डी.के. जैन यांनी नोटीस बजावली आहे. या तिघांनी आपली बाजू मांडताना हित जोपासण्याचा मुद्दा फेटाळून लावला आहे.

 

Web Title:  The BCCI is responsible for the current situation, the reply of Tendulkar to the Lokpal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.