Join us  

बीसीसीआयचे चोचले... आठ दिवसांत सचिवांना तब्बल चार लाखांचा भत्ता

भारतात काम करत असतील तर त्यांनी 20 हजार रुपये दिले जातात, परदेशात तर त्यांना एका दिवसासाठी 750 डॉलर दिले जातात. फिफाच्या सदस्यांना तर दिवसाला 150 डॉलर दिले जातात.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2018 4:31 PM

Open in App
ठळक मुद्देबीसीसीआय आपल्या पदाधिकाऱ्यांना क्रीडा जगतात सर्वात जास्त भत्ते देणारी संघटना ठरली आहे.

नवी दिल्ली : बीसीसीआय ही एक धनाढ्य संघटना आहे. आपल्या पदाधिकाऱ्यांवर खर्च करण्याच्या बाबतीत तर बीसीसीआयने फिफालाही मागे टाकले आहे. बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांच्या आठ दिवसांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने त्यांना तब्बल चार लाख रुपयांचा भत्ता दिला होता.

बीसीसीआय आपल्या पदाधिकाऱ्यांना क्रीडा जगतात सर्वात जास्त भत्ते देणारी संघटना ठरली आहे. जर पदाधिकारी भारतात काम करत असतील तर त्यांनी 20 हजार रुपये दिले जातात, परदेशात तर त्यांना एका दिवसासाठी 750 डॉलर दिले जातात. फिफाच्या सदस्यांना तर दिवसाला 150 डॉलर दिले जातात. गेल्या 110 दिवसांमध्ये बीसीसीआयने आपल्या पदाधिकाऱ्यांच्या भत्त्यावर 25 लाख रुपये खर्च केले आहेत.

टॅग्स :बीसीसीआयक्रिकेट