Join us  

BCCI नं पर्याय शोधला; IPL 2020 होणार अन् धावांचा पाऊस पडणार, पण कधी?

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३ व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट कायम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 12:07 PM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३ व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट कायम आहे. २९ मार्चला सुरू होणारी ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) घेतला. त्यात केंद्र सरकारनं १५ एप्रिलपर्यंत परदेशी पर्यटकांना व्हिसा न देण्याचा निर्णय घेतल्यानं आयपीएलला मोठा फटका बसणार आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझी मालकांमध्ये वारंवार बैठका होत आहेत. मंगळवारी फ्रँचायझी मालकांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे एक बैठक झाली. त्यानंतर बीसीसीआयनं आयपीएलसाठी नवा पर्याय शोधल्याचे वृत्त समोर येत आहे.  

शनिवारी आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आठ फ्रँचायझी मालकांसह तातडीची बैठक पार पडली आणि त्यात अनेक विषयांवर चर्चा केली गेली. प्रत्येकानं आपापली मतं व्यक्त करताना प्रेक्षकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. या बैठकीत ६-७ पर्यायांवर चर्चा केली गेली. आयपीएल स्पर्धा उशीरानं सुरु झाली, तर लीगचे स्वरूप कसे असेल, आठ संघांची दोन गटांत विभागणी करून वन डे वर्ल्ड कप स्पर्धेप्रमाणे लीग खेळवता येईल का, डबल हेडर सामन्यांची संख्या वाढवली जाऊ शकते का की दिवसाला तीन सामने खेळवण्यात यावे, आदी अनेक मुद्यांवर चर्चा केली गेली. 

याचवेळी परिस्थिती सुधारल्यास आयपीएल कोणत्या तारखेपासून सुरू करायची यावरही चर्चा झाली. त्यानुसार १५ एप्रिल, २१ एप्रिल, २५ एप्रिल, १ मे आणि ५ मे अशा तारखांचा पर्याय ठेवण्यात आळा. त्यामुळे परिस्थिती सुधारल्यास या पाचपैकी एका तारखेपासून आयपीएल सुरू होईल. बीसीसीआयनं हे आधीच स्पष्ट केलं आहे की ही स्पर्धा २५ एप्रिलपर्यंत सुरू केली जाईल. तसे न झाल्यास पुढे सर्व सामने खेळवण्याची समस्या निर्माण होऊ शकते. 

पण, आता अपडेट बातमी समोर येतेय. टाईम्स ऑफ इंडियनं दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयनं आयपीएल घेण्यासाठी नवा पर्याय शोधला आहे. ''२००९ची आयपीएल दक्षिण आफ्रिकेत घेतली गेली होती आणि ३७ दिवसांता स्पर्धा पार पडली होती. अशा प्रकारची विंडो उपलब्ध असल्यास आयपीएल भारत आणि परदेशात अशी दोन टप्प्यांत घेतली जाऊ शकते किंवा संपूर्ण स्पर्धा परदेशात होऊ शकते. कोरोना व्हायरसवर सर्वकाही अवलंबून आहे,'' असे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार जुलै-सप्टेंबरमध्ये कोणतेही मोठी स्पर्धा नाही. आशिया चषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार आहे. त्याव्यतिरिक्त विराट कोहलीची टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी श्रीलंकाविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

महेंद्रसिंग धोनीची कारकीर्द संपली?

टॅग्स :आयपीएल 2020कोरोना वायरस बातम्याबीसीसीआय