Join us  

IPL 2024 च्या वेळापत्रकात होणार बदल? सुरक्षेच्या कारणास्तव या संघांमधील लढतीत बदल

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या सामन्याचे ठिकाण बदलण्याचा किंवा दुसऱ्या दिवशी खेळवण्याचा विचार करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 5:04 PM

Open in App

IPL 2024 Schedule : ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना मूळ नियोजित १७ एप्रिलला होणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या सामन्याचे ठिकाण बदलण्याचा किंवा दुसऱ्या दिवशी खेळवण्याचा विचार करत आहे. या दिवशी रामनवमी उत्सव असल्याने ती देशभरात साजरी होणार आहे. त्यामुळे कोलकाता येथे होणाऱ्या लढतीसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवणे शक्य होणार नसल्याने हा सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाऊ शकतो.  

लोकसभेच्या निवडणुकाही जवळ येत आहेत आणि वेळापत्रकानुसार गोष्टी अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे. BCCI हा सामना पुढे ढकलण्याचा विचार करत असल्याचे क्रिकबजने म्हटले आहे. फ्रँचायझी, ब्रॉडकास्टर्स आणि राज्य संघटनांना याबाबतचे संकेत दिले आहेत. BCCI आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) कोलकाता पोलिसांशी चर्चा करत आहेत. बीसीसीआयने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. "पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे आणि आम्ही लवकरच निर्णय घेऊ," असे एका आयपीएल अधिकाऱ्याने सांगितले. 

BCCI ने IPL 2024 चे वेळापत्रक दोन टप्प्यात जाहीर केले. त्यात पहिल्या दोन आठवड्यांच्या २१ सामन्यांचे वेळापत्रक आधी जाहीर केले गेले होते. उर्वरित वेळापत्रक निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर जाहीर केले गेले. IPL 2024 च्या १४व्या सामन्यापूर्वी KKR आणि RR हे दोनच अपराजित संघ आहेत. त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय नोंदवले आहेत. KKR ने सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला, तर RR ने लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सवर विजय नोंदवला. आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर RR चा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे.   

टॅग्स :आयपीएल २०२४बीसीसीआयकोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्स