Join us  

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने ठेवल्या 'या' तीन अटी 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 4:41 PM

Open in App

मुंबईः भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. सध्या रवी शास्त्री हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत आणि वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. त्यामुळे बीसीसीआयनं नव्या प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले आहेत आणि या पदासाठी बीसीसीआयनं तीन अटी ठेवल्या आहेत.

... तर 'या' दिवशी महेंद्रसिंग धोनी खेळणार अखेरचा सामना?

वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघात बदलाचे वारे वाहत आहेत. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह साहाय्यक प्रशिक्षकांचा कार्यकाळ वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतच होता. परंतु, त्यांना आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या करारात वाढ न करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. त्यामुळेच बीसीसीआयनं मुख्य प्रशिक्षकासह, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक, फिजिओथेरेपिस्ट, तंदुरुस्ती प्रशिक्षक आणि प्रशासकीय व्यवस्थापक या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी 30 जुलै 2019, सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करायचे आहेत. 

BREAKING: बीसीसीआयमध्ये मेगाभरती; मुख्य प्रशिक्षकासह महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज

मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 60 वर्षांहून कमी असावे आणि त्याच्याकडे किमान दोन वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असावा, अशी अट ठेवली आहे. जुलै 2017 मध्ये रवी शास्त्री यांची निवड करण्यापूर्वी या पदाकरिता 9 अटी ठेवण्यात आल्या होत्या. पण, यंदा तीनच अटी ठेवण्यात आल्या आहेत. सध्या कार्यरत असलेला प्रशिक्षकही पुन्हा अर्ज करू शकतील आणि ते या अटींत बसतात, असे बीसीसीआयने स्पष्ट केले.

विंडीज दौऱ्यात टीम इंडियात नव्या खेळाडूंना संधी, 'या' दिग्गजांना विश्रांती?या आहेत अटी- मुख्य प्रशिक्षकाकडे कसोटी खेळणाऱ्या संघाला दोन ते तीन वर्ष प्रशिक्षक करण्याचा अनुभव असावा. शिवाय त्याने 30 कसोटी किंवा 50 वन डे सामने खेळलेले असावेत-  फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने किमान 10 कसोटी किंवा 25 वन डे सामने खेळलेले असावेत - त्यांचे वय 60 वर्षांहून कमी असावेत

टॅग्स :बीसीसीआयरवी शास्त्री