Join us  

'त्या' विधानाची बीसीसीआयकडून दखल, हार्दिक पांड्यावर कारवाई ? 

भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात केलेल्या धक्कादायक विधानाबद्दल माफी मागितली असली तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) त्याचं वागणं पटलेलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 12:04 PM

Open in App
ठळक मुद्देहार्दिक पांड्याने कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात धक्कादायक विधान केलेनेटिझन्सने फटकारल्यानंतर पांड्याने बुधवारी माफी मागितली

मुंबई : भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानेकॉफी विथ करण 6 कार्यक्रमात केलेल्या धक्कादायक विधानाबद्दल माफी मागितली असली तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) त्याचं वागणं पटलेलं नाही. त्यामुळेच पांड्यावर कारवाई करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. या कार्यक्रमात पांड्यासोबत भारताचा सलामीवीर लोकेश राहुलही उपस्थित होता. कार्यक्रमाच्या प्रक्षेपणानंतर पांड्याच्या अनेक मुद्यांवर नेटिझन्सने सडकून टीका केली. पांड्याचे ते विधान महिलांचा अनादर करणारे असल्यामुळे अनेकांनी पांड्याला चांगलेच सुनावले. प्रशासकीय समितीने पांड्या व राहुल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि 24 तासांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

बीसीसीआयनेही त्याच्या विधानावर योग्य ती कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे. बीसीसीआयचे अधिकारी तो संपूर्ण एपिसोड पाहणार असून त्यानंतर योग्य कारवाई करणार असल्याचे, सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. ''माफी मागून चूक लपवता येत नाही. महिलांबद्दल त्याचे काय मत आहे, हे पांड्याच्या विधानातून दिसून येतं. त्याचे हे वागणं चुकीचे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूने कसं वागावं याची जाण त्याला व्हायला हवी. त्यापेक्षाही काय योग्य काय अयोग्य हेही त्याला कळायला हवं,'' असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

करणने या दोघांनी त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारले असता हार्दिकने कुटुंबीय खुलेपणाने माझ्या सेक्स लाइफबद्दल चर्चा करतात असे उत्तर दिले. तो पुढे म्हणाला,''एकदा आई-बाबांबरोबर एका पार्टीला गेलो होतो तेव्हा तेथे उपस्थित कोणत्या मुलीबरोबर शरीर संबंध झाल्याचे त्यांनी मला विचारले. त्यावेळी मी अनेकींकडे बोट दाखवले.  आपलं कौमार्य गमावल्याबद्दलही मी पालकांना अगदी कूलपणे सांगितले. मी घरी आल्यावर पालकांना ‘आज मी करुन आलो’ असंही मी सांगतो.''

दरम्यान, पांड्याच्या या बिनधास्त वक्तव्याचा नेटिझन्सने चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर पांड्याने बुधवारी इस्टाग्रामवरून सर्वांची माफी मागितली. तो म्हणाला,''कॉफी विथ करण या कार्यक्रमातील माझ्या वक्तव्यावर कोणाची मनं दुखावली असतील, तर त्यांची माफी मागतो. मला कोणालाही दुखवायचे नव्हते.''  

टॅग्स :हार्दिक पांड्याकॉफी विथ करण 6बीसीसीआय