Join us

अव्वल क्रिकेटपटूंवर बीसीसीआयची नजर; कामगिरी आणि फिटनेसचा डाटाबेस तयार होणार

सात आठवडे चालणाऱ्या आयपीएलच्या ११ व्या पर्वात खेळणाºया आघाडीच्या ५० क्रिकेटपटूंची कामगिरी आणि फिटनेस यावर बीसीसीआय जवळून नजर ठेवणार आहे. या खेळाडूंना मोठ्या आंतरराष्टÑीय स्पर्धांसाठी ताजेतवाने ठेवता यावे हा यामगील हेतू आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 03:08 IST

Open in App

नवी दिल्ली : सात आठवडे चालणाऱ्या आयपीएलच्या ११ व्या पर्वात खेळणाºया आघाडीच्या ५० क्रिकेटपटूंची कामगिरी आणि फिटनेस यावर बीसीसीआय जवळून नजर ठेवणार आहे. या खेळाडूंना मोठ्या आंतरराष्टÑीय स्पर्धांसाठी ताजेतवाने ठेवता यावे हा यामगील हेतू आहे.आघाडीचे आंतरराष्टÑीय क्रिकेटपटू आणि स्थानिक प्रतिभावान खेळाडू यांचा वेगवेगळा पूल तयार करण्याचा बीसीसीआयचा विचार असल्याची माहिती आहे. यामुळे संघाची कामगिरी उंचावणे आणि खेळाडूंना जखमांपासून दूर ठेवणे शक्य होणार आहे. बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ अधिकाºयाने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर या वृत्तास दुजोरा दिला. या योजनेला मूर्त स्वरुप देण्यात येत असल्याची माहिती देत हा अधिकारी म्हणाला,‘आम्ही आघाडीच्या ५० खेळाडूंवर जवळून लक्ष ठेणार आहोत. या ५० जणांमध्ये २७ जण केंद्रीय करारप्राप्त तसेच २३ अन्य खेळाडू असतील. आयपीएलदरम्यान या खेळाडूंची कामगिरी आणि हालचालींवर विशेष लक्ष असेल. भारताच्या ब्रिटन दौºयापासून खेळाडूंच्या कामगिरीनुसार संधी दिली जाणार आहे. २०१९ च्या विश्वचषकापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. या खेळाडूंमधून आवश्यक फिटनेस नसणाºया खेळाडृंच्या नावाचा विचार भारतीय अ संघासाठीही होणार नाही. फिजिओ पॅट्रिक फरहार्ट हे राष्टÑीय क्रिकेट अकादमीत खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषण करणार आहेत. या विश्लेषणाचे मापदंड तयार करण्यात आले आहेत. एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील राष्टÑीय क्रिकेट अकादमी अंतिम ३३ खेळाडूंच्या निवडीत मोठी भूमिका वठविणार आहे.बीसीसीआयने याआधी आयपीएलदरम्यान वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीवर नजर ठेवण्यासाठी योजना आखली होती. त्यानुसार प्रत्येक करारबद्ध खेळाडूला नेटवर मर्यादित गोलंदाजी करण्याची संधी देण्यात आली होती.पुढील नऊ महिन्यात भारतीय संघ इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया दौºयावर जाणार आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :बीसीसीआय