नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगदरम्यान अतिरिक्त ताण पडू नये यासाठी बीसीसीआयने विविध वयोगटातील २३ खेळाडूंवर बारकाईने नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यात विराट कोहली, रोहित आणि धोनीपासून युवा पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल आणि शिवम मावीसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.येत्या काही महिन्यांत युवा खेळाडूंना राष्टÑीय किंवा अ संघात स्थान देण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, मुख्य योजना खेळाडूंची विभागणी तीन गटांत करणे ही आहे. पहिल्या गटात सध्याच्या अंडर १९ खेळाडूंचा, दुसºया गटात तीन-चार वर्षांपासून खेळत असलेले जुने अंडर १९ खेळाडू आणि तिसºया गटात सध्याच्या अ संघात खेळणाºयांचा समावेश आहे. आयपीएलच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडूंना सारखा प्रवास करावा लागतो. सामन्यादरम्यान फारच कमी वेळ असल्याने कामाचा ताण वाढतो. उदाहरणार्थ, शिवम मावी किंवा नवदीप सैनी यांना सरावादरम्यान त्यांचे आयपीएल फ्रॅन्चायझी कोच ख्रिस लीन किंवा डिव्हिलियर्सला ताशी १०० किमी वेगाने चेंडू टाकायला भाग पाडू शकतात. बीसीसीआयचा यावर आक्षेप आहे. युवा खेळाडू देशाची संपत्ती आहेत. भुवनेश्वर कुमार याला दडपण आणि कामाचा त्राण माहिती असावा; पण मावी, नवदीप किंवा आवेश खान यांच्याबाबत विचाराल तर भारतीय क्रिकेटच्या हितावह या नवोदितांना रोखावेच लागेल. यामुळे सर्व आठही फ्रॅन्चायझी कोच आणि फिजियोंनी नवोदित खेळाडूंच्या कामाचे ओझे आणि अतिरिक्त दडपण याची माहिती एनसीएला सातत्याने द्यायला हवी.’ बंगालचा अभिमन्यू ईश्वरन याचा यादीत समावेश नाही, असे कळते. तो आयपीएलमध्ये नाही; पण भारताच्या इंग्लंड दौºयात अ संघात त्याचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)सध्याचे अंडर १९ खेळाडूपृथ्वी शॉ, शुभमन गिल, शिवम मावी आणि कमलेश नागरकोटी. माजी अंडर १९ : ईशान किशन, ऋषभ पंत, आवेश खान, खलील अहमद आणि संजू सॅमसन. भारत अ : श्रेयश अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, विजय शंकर, जयदेव उनाडकट, बासिल थम्पी, दीपक हुडा, मयंक अग्रवाल, रविकुमार समर्थ, नवदीप सैनी, सिद्धार्थ कौल, हनुमान विहारी आणि अंकित बावणे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ‘त्या’ २३ खेळाडूंवर बीसीसीआयची नजर; खेळाडूंवरील अतिरिक्त ताण कमी करण्यास प्राधान्य
‘त्या’ २३ खेळाडूंवर बीसीसीआयची नजर; खेळाडूंवरील अतिरिक्त ताण कमी करण्यास प्राधान्य
इंडियन प्रीमियर लीगदरम्यान अतिरिक्त ताण पडू नये यासाठी बीसीसीआयने विविध वयोगटातील २३ खेळाडूंवर बारकाईने नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यात विराट कोहली, रोहित आणि धोनीपासून युवा पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल आणि शिवम मावीसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 02:52 IST