Join us  

BCCI मध्ये वशिला नसल्यामुळे मुख्य प्रशिक्षक झालो नाही, विरुचा गौप्यस्फोट

बीसीसीआयमध्ये माझा वशिला नव्हता त्यामुळे मी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होऊ शकलो नाही, असा गौप्यस्फोट भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने केला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 7:52 PM

Open in App

नवी दिल्ली, दि. 15 - बीसीसीआयमध्ये माझा वशिला नव्हता त्यामुळे मी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होऊ शकलो नाही, असा गौप्यस्फोट भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने केला आहे. मी पुन्हा प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार नाही, असेही सेहवागने स्पष्ट शब्दांत सांगितले. सेहवागच्या या वक्तव्यमुळे प्रशिक्षक पदाचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. 

एका चॅनेलला दिलेल्या मुलाखती तो म्हणाला की, मी आपल्या मनानुसार नव्हते तर बीसीसीआयच्या काही सदस्यांनी सांगितल्यानंतर प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला होता. जून 2017 मध्ये अनिल कुंबळेला हटविण्यात आल्यानंतर जुलैमध्ये रवी शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक बनले. त्यासाठी बीसीसीआयने अर्ज मागविण्यापासून मुलाखतीपर्यंतची प्रक्रिया केली होती. 

यावेळी बोलताना सेहवागने सांगितले की, मला या कामात रस नव्हता. बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांच्या सांगण्यानुसार मी मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला होता. अर्ज करण्यापूर्वी मी विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यासोबत चर्चा केली होती. तेव्हा शास्त्रीने सांगितले होते की ते पूर्वी केलेली चूक मी आता पून्हा करणार नाही. मुख्य प्रशिक्षक पदाच्या रेसमध्ये मी नाही.

तर मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला नसता - जूनमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान सेहवाग इंग्लंडमध्ये होता. तेव्हा शास्त्रीसोबत त्याने याबाबत चर्चा केली होती. जर मला शास्त्री मुख्य प्रशिक्षक पदाच्या जागेसाठी अर्ज करणार आहे हे माहिती असते तर मी अर्ज केला नसता. रवी शास्त्री हेच कोचच्या पोस्टसाठी विराट कोहलीचे आवडते होते. 10 जुलैला मुख्य प्रशिक्षक पदाची घोषणा बीसीसीआयच्या सल्लागार समितीने करायची होती. त्याच्या काही दिवसापुर्वीच शास्त्री या पदासाठी उमेदवार झाले होते.

मुलाखत प्रक्रिया?10 जुलै रोजी कोचची घोषणा क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य सौरव गांगुली, वीवीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर हे करणार होते. दिवसभर मुंबईत या मुलाखतीची प्रक्रिया चालली. वीरेंद्र सेहवाग हा सुध्दा मुलाखतीसाठी आला होता. सेहवागचे प्रेझेन्टेशन सुमारे 2 तास चालले होते. तर रवी शास्त्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे यात सामील झाले होते.

सेहवागचा अर्ज?-सेहवागने BCCI ला केवळ 2 ओळींचा अर्ज केला होता. त्यात लिहिले होते की, त्यात त्याने आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा मेंटर असल्याचे सांगितले होते आणि त्यांच्यासोबत यापूर्वीही खेळलो असल्याचे सांगितले.

टॅग्स :बीसीसीआयक्रिकेटभारतीय क्रिकेट संघरवी शास्त्री