Join us

बीसीसीआयची खेळाडूंच्या कराराला मंजुरी

भारतीय क्रिकेटपटूंच्या केंद्रीय कराराला अखेर बीसीसीआयने आज आमसभेच्या विशेष बैठकीत मंजुरी दिली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 04:02 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटूंच्या केंद्रीय कराराला अखेर बीसीसीआयने आज आमसभेच्या विशेष बैठकीत मंजुरी दिली आहे. त्यामुळे ब्रिटनच्या दौऱ्याच्या अनिश्चिततेचा कालावधी संपला. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीने ७ मार्चला खेळाडूंच्या नवीन कराराची घोषणा केली होती. मात्र बोर्डाचे कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी यांनी त्यावर सही करण्यास नकार दिला होता. त्याला आमसभेची मंजुरी आवश्यक असल्याचे चौधरी यांनी त्या वेळी सांगितले होते.शुक्रवारी झालेल्या बैठकीत २८ राज्य संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यात या कराराला मंजुरी देण्यात आली. चौधरी यांनी सांगितले की, ‘आज एसजीएम झाली. आमसभेने सर्वसंमतीने हा प्रस्ताव पारित केला.’ आता खेळाडूंना ब्रिटन दौºयाच्या आधी वेतन दिले जाईल. भारतीय संघ ब्रिटन दौºयाला आज रवाना होत आहे. या करारानुसार ए प्लस श्रेणी असलेल्या खेळाडूला सात कोटी रुपये, ए, बी आणि सी श्रेणी असलेल्या खेळाडूंना अनुक्रमे पाच कोटी, तीन कोटी आणि एक कोटी रुपये दिले जातील.आमसभेने देशांतर्गत सत्रात पूर्वोत्तर राज्य आणि बिहारच्या संघांना प्लेट गटात उतरण्याला मंजुरी दिली. उत्तराखंडच्या संघाला रणजीत खेळण्यास सीओएने परवानगी दिली होती. मात्र आमसभेने त्यास मंजूरी दिली नाही. (वृत्तसंस्था)>‘चॅम्पियन्स’ चुकीसाठी जोहरी जबाबदारअमिताभ चौधरी यांनी २०२१ मध्ये होणाºया चॅम्पियन्स ट्रॉफीला विश्व टी-२० मध्ये बदलण्याच्या आयसीसीच्या निर्णयाला विरोध न केल्याबद्दल सीईओ राहुल जोहरी यांना त्यांचे नाव न घेता जबाबदार धरले. चौधरी म्हणाले की, ‘लोक म्हणत आहेत की, जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफी बदलण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी त्यावर आक्षेप का घेतला नाही? पण, हा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या बैठकीत घेण्यात आला होता.’

टॅग्स :बीसीसीआय