Join us  

फलंदाजीचा क्रम भारतासाठी फायदेशीर

भारताने इंग्लंडवर पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवला. के. एल. राहुल याने झळकावलेले शतक हे संस्मरणीय आहे. टी २० मध्ये शतक झळकावणे ही सोपी गोष्ट नसते. मात्र तरीही कामगिरीच्या बाबतीत त्याचा दुसरा क्रमांक लागतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 6:13 AM

Open in App

- अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)भारताने इंग्लंडवर पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवला. के. एल. राहुल याने झळकावलेले शतक हे संस्मरणीय आहे. टी २० मध्ये शतक झळकावणे ही सोपी गोष्ट नसते. मात्र तरीही कामगिरीच्या बाबतीत त्याचा दुसरा क्रमांक लागतो. कारण पहिल्या स्थानावर कुलदीप यादव आहे. कुलदीपने २४ धावांच्या मोबदल्यात पाच गडी बाद करुन इंग्लंडचे कंबरडेच मोडले.पहिल्या पाच षटकांत इंग्लंडने ५० धावा केल्या होत्या. तरीही त्यांना १५९ धावाच जमवता आल्या. इंग्लंडमध्ये कडक उन्हाळा सुरू आहे.खेळपट्टी चांगली आहे. त्याचा फायदा फलंदाजांना होत आहे. चहल चांगल्या फॉर्ममध्ये नाही. मात्र कुलदीप यादव हा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने फ्लाईट करत फलंदाजाला चांगलेच चकवले. एकही फलंदाज त्याची गोलंदाजी समजू शकला नाही.त्या जोरावरच त्याची निवड कसोटी मालिकेत होऊ शकते. अव्वल ११ मध्ये त्याची निवड होऊ शकणार नाही. मात्र कसोटी संघात त्याची निवड होऊ शकले. हा संघ लवकरच जाहीर होणार आहे. कुलदीप यादव फिरकीपटू म्हणून संघात येऊ शकतो. त्यामुळे अश्विन आणि जडेजा यांना चांगलीच टक्कर मिळेल.पहिल्या सामन्यात हा मोठा विजय आहे. आयर्लंडला सहजतेने पराभूत केले होते. असे वाटत होते की इंग्लंड भारताला चांगली टक्कर देईल, पण असे झाले नाही. विराटने चौथ्या क्रमांकावर आला. कुठेतरी असे वाटते भारताचा फलंदाजी क्रम हाच कायम राहील. के.एल. राहुल याला खालच्या क्रमांकावर पाठवता येणार नाही.उमेश यादवचेही कौतुक करावे लागेल. टी २० साठी तो पहिली पसंती गोलंदाज नव्हता. त्याने चांगली गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीत वेग होता. तसेच अचूकताही होती. भुवनेश्वर कुमारने मात्र जास्त धावा दिल्या. यादव याने जसप्रीत बुमरा याची उणीव भासू दिली नाही.ही मालिका जिंकल्यास भारताला एकदिवसीय मालिकेसाठी लाभ होईल.फिफा विश्वचषक उपांत्यपूर्व फेरी सामन्यांची उत्सुकता...विश्वचषक फुटबॉलमध्ये उपात्य फेरीसाठी फ्रान्सविरुद्ध उरुग्वे आणि ब्राझिलविरुद्ध बेल्जिअम हे सामने अत्यंत चुरशीचे होतील. फ्रान्सचा एमबापे हा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्याकडे चांगला वेग आहे. तसेच त्याच्या मैदानातील हालचाली सांगतात की तो उगवता स्टार आहे. असेच काहीसे नेमारचे आहे. त्याने मागच्या सामन्यात चांगला गोलदेखील केला. तो ब्राझिलला पुढे नेऊ शकतो. मात्र तो मैदानावर जितका चांगला खेळतो तितका जखमी झाल्याचा चांगलाच अभिनय देखील करू शकतो. फुटबॉलमध्ये खेळाडूंना जखमी होण्याची भीती असते. उगाचच दुखापतीचे नाटक केले तर रेफ्री देखील त्याकडे दुर्लक्ष करतात. युवा चाहत्यांवरही त्याचा परिणाम होतो. उपांत्यपूर्व फेरीचे सामने सहा आणि सात जुलैला होणार आहे. आतापर्यंत ही स्पर्धा चुरशीची झाली आहे. या आधी कोणतीही स्पर्धा एवढी चुरशीची झाली नव्हती. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीचे सामनेही एवढ्याच चुरशीचे होतात का, हे पाहणेही रंजक ठरेल.व्हिडीओसाठी पाहा -  https://www.facebook.com/lokmat/videos

टॅग्स :क्रिकेट