Join us  

'ते' कमनशिबी 13 फलंदाज 99 धावांवर राहिले नाबाद, वीरेंद्र सेहवागचाही समावेश

कोणत्याही स्तराच्या क्रिकेटमध्ये शतकाला अनन्यसाधारण महत्त्व असते. म्हणून आपल्या नावावर कसेही करुन शतक लागावे, अशी प्रत्येक फलंदाजाची धडपड असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 3:08 PM

Open in App

ललित झांबरे /जळगाव - कोणत्याही स्तराच्या क्रिकेटमध्ये शतकाला अनन्यसाधारण महत्त्व असते. म्हणून आपल्या नावावर कसेही करुन शतक लागावे, अशी प्रत्येक फलंदाजाची धडपड असते. परंतु काही मोजक्या फलंदाजांची गाडी नेमकी 99 धावांवर अडकते. दुर्देवाने काही फलंदाज नेमके 99 धावांवर बाद होतात तर काही असे कमनशिबी ठरतात की ते 99 वर खेळत असतानाच एकतर कधी डावच संपतो किंवा कधी संघच विजयी होतो. वन-डे क्रिकेटच्या इतिहासात केवळ 13 असे कमनशिबी फलंदाज आहेत. त्यात वीरेंद्र सेहवाग हा एकमेव भारतीय आहे. 

संघविजयाने हुकले शतकया 13 पैकी 7 फलंदाज असे आहेत की ते 99 धावांवर खेळत असतानाच नेमका संघ विजयी झाला. त्यामुळे त्यांना शतकापासून वंचित रहावे लागले. या 7 फलंदाजांमध्ये वेस्ट इंडिजचा रिची रिचर्डसन, झिम्बाब्वेचा अॅलिस्टर कॅम्पबेल, ऑस्ट्रेलियाचा ब्रॅड हॉज, भारतीय खेळाडू विरेंद्र सेहवाग, झिम्बाब्वेचा माल्कम वॉकर, स्कॉटलंडचा कॅलम मॅक्लिओड आणि अमिरातीचा स्वप्नील पाटील यांचा समावेश आहे. 

शतकाआधीच डाव आटोपलाउरलेले 6 कमनशिबी फलंदाज म्हणजे न्यूझीलंडचा ब्रुस एडगर, ऑस्ट्रेलियाचा डीन जोन्स, झिम्बाब्वेचा अँडी फ्लॉवर, वेस्ट इंडिजचा रामनरेश सारवान, पाकिस्तानचा मोहम्मद युसुफ, ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क हे प्रथम फलंदाजी करताना डावच संपल्याने 99 वर नाबाद राहिले. 

वॉलर खालच्या क्रमांकावरुन नाबाद 99यापैकी ब्रुस एडगर, रिचर्डसन, कॅम्पबेल, सेहवाग आणि मॅक्लिओड हे सलामीवीर. त्यांनी शेवटपर्यंत नाबाद राहणे हे तर विशेषच. पण झिम्बाब्वेचा माल्कम वॉलर हा वेगळा ठरतो तो यासाठी की तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन 99 धावांवर नाबाद राहिला. ब्रॅड हॉज व स्वप्नील पाटील हे पाचव्या क्रमांकावर खेळले. 

सेहवाग सर्वात कमी वेळातआपला विरुसुद्ध वेगळा आहे तो यासाठी की सर्वात कमी खेळात आटोपलेल्या डावात (34.3 षटके) तो 99 धावांवर नाबाद राहिलाय. त्याखालोखाल मॅक्लिओड (42.2 षटके), रिचर्डसन (44.1 षटके) खेळात शतकाच्या उंबरठ्यावर नाबाद राहिले. 

(माल्कम वॉलर)

यांच्या नावावर शतक लागलेच नाहीया नाबाद 99 विरांमध्ये माल्कम वॉकर व स्वप्नील पाटील हे दोनच असे फलंदाज आहेत की त्यांच्या नावावर एकही शतक नाही म्हणजे नाबाद 99 अशी सर्वोच्च धावसंख्या नोंदवणारे ते खऱ्या अर्थाने कमनशिबी आहेत. 99 धावांचाच विषय आहे म्हणून वन-डे क्रिकेटमध्ये ज्याच्या नावावर एकही शतक नाही आणि जो   99  धावांवर बाद झालाय असा एकमेव,फलंदाज झिम्बाब्वेचा सी.जे. चिभाभा आहे. 100सामन्यात त्याच्या नावावर 2346 धावा आहेत पण शतक एकही नाही मात्र सर्वोच्च धावसंख्या 99 ची आहे. याच प्रकारे वॉलरच्या 70.सामन्यात 1172 धावा आणि स्वप्नील पाटीलच्या 13 सामन्यात 263 धावा असल्या तरी सर्वोच्च खेळी नाबाद 99 धावांची आहे.

नाबाद 99 वीर

फलंदाज           देश              विरुद्ध                 वर्षब्रुस एडगर       न्यूझीलंड     भारत                1981डीन जोन्स     ऑस्ट्रेलिया   श्रीलंका               1985रिचर्डसन        विंडिज         पाकिस्तान         1985अँडी फ्लॉवर   झिम्बाब्वे     ऑस्ट्रेलिया         1999कॅम्पबेल        झिम्बाब्वे     न्यूझीलंड           2000सारवान          विंडिज         भारत                2002ब्रॅड हॉज          ऑस्ट्रेलिया    न्यूझीलंड         2007मो. युसुफ       पाकिस्तान     भारत              2007एम. क्लार्क    ऑस्ट्रेलिया       इंग्लंड           2010सेहवाग          भारत           श्रीलंका             2010एम. वॉलर     झिम्बाब्वे      न्यूझीलंड         2011मॅक्लीओड     स्कॉट.        कॅनडा                 2012एस.पाटील    अमिराती      स्कॉट.              2014

टॅग्स :क्रिकेटविरेंद्र सेहवाग