Join us  

फलंदाज बाद नव्हता, तरीही मैदानात झाले सेलिब्रेशन

फलंदाज बाद झालेला नसताही मैदानात सेलिब्रेशन झाल्याची गोष्ट पाहायला मिळाली. ही गोष्ट घडली ती कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 8:52 PM

Open in App
ठळक मुद्देही गोष्ट घडली ती सेंट लुशिया स्टार्स संघ फलंदाजी करत असताना.

नवी दिल्ली : एखादा खेळाडू बाद झाला की मैदानात सेलिब्रेशन होते, हे आपल्यासाठी नित्याचेच आहे. पण फलंदाज बाद झालेला नसताही मैदानात सेलिब्रेशन झाल्याची गोष्ट पाहायला मिळाली. ही गोष्ट घडली ती कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये.

या लीगमध्ये त्रिनबागो नाईट रायडर्स आणि सेंट लुशिया स्टार्स यांच्यामध्ये सामना सुरु होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना नाईट रायडर्स संघाने 195 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सेंट लुशिया स्टार्स संघाला 95 धावाच करता आल्या आणि त्यांना 100 धावांनी पराभव पत्करावा लागला. पण ही गोष्ट घडली ती सेंट लुशिया स्टार्स संघ फलंदाजी करत असताना.

नाइट रायडर्स संघाकडून अली खान पहिले षटक टाकत होता. त्यावेळी त्याच्या चेंडूने आंद्रे फ्लेचरच्या बॅटची कडा घेतली आणि हा चेंडू यष्टीरक्षक दिनेश रामदिनच्या हातामध्ये गेला. त्यावेळी नाइट रायडर्स संघाकडून सेलिब्रेशन करायला सुरुवात झाली. पण काही वेळात रामदिनच्या हातून चेंडू निसटला आणि फलंदाज नाबाद असल्याची गोष्ट समोर आली.

हा पाहा व्हिडीओ

टॅग्स :क्रिकेटक्रीडा