Join us
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशने टी२० मालिका जिंकली, विंडीजचा १९ धावांनी केला पराभव

बांगलादेशने पावसाच्या व्यत्ययात झालेल्या तिसऱ्या व अखेरच्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर १९ धावांनी पराभव करुन तीन सामन्यांची २-१ अशी मालिका जिंकली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 04:08 IST

Open in App

लाडेरहिल : बांगलादेशने पावसाच्या व्यत्ययात झालेल्या तिसऱ्या व अखेरच्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर १९ धावांनी पराभव करुन तीन सामन्यांची २-१ अशी मालिका जिंकली.आंद्रे रसेलने २१ चेंडूंना सामोरे जाताना ६ षटकार व एक चौकाराच्या मदतीने ४७ धावा केल्या, पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याचे हे प्रयत्न अपुरेच पडले. त्याआधी, बांगलादेशने ५ बाद १८४ धावांची मजल मारली होती. रसेल १८ व्या षटकात मुस्ताफिजूर रहमानच्या गोलंदाजीत बाद झाला. येथेच विंडीजचा पराभव निश्चित झाला. रसेल बाद झाला त्यावेळी विंडीजची १७.१ षटकांत ७ बाद १३५ अशी स्थिती होती. या दौºयात दोन्ही कसोटी सामने गमावणाºया बांगलादेशने एकदिवसीय मालिकाही २-१ ने जिंकली होती.कर्णधार शाकिब-अल-हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर लिटन दासने ३२ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ६१ धावा फटकावल्या. त्याने तामिम इक्बालसह सलामीला २८ चेंडूत ६१ धावांची भागीदारी केली. कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने बांगलादेशच्या धावगतीला लगाम घातला. तामिम (२१) बाद झाल्यानंतर ठराविक अंतराने बांगलादेशला धक्के बसले. महमुदुल्लाने नाबाद ३२ धावा करत आरिफुल हकसह सहाव्या गड्यासाठी ३८ धावांची अभेद्य भागीदारी केली.

टॅग्स :बांगलादेश