वर्ल्डकपमधील Timed-out चं भूत पुन्हा बाहेर, मालिका जिंकताच बांगलादेशने काढली श्रीलंकेची कळ  

Bangladesh Vs Sri lanka 3rd ODI: बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना झाल्यावर बांगलादेशचा फलंदाज मुशफिकूर रहिम याने असं काही केलं ज्यामुळे काही महिन्यांपूर्वी घडलेल्या टाइम आऊट प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या.  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 12:15 AM2024-03-19T00:15:29+5:302024-03-19T00:15:59+5:30

whatsapp join usJoin us
Bangladesh Vs Sri lanka: The ghost of Timed-out in the World Cup is out again, as soon as Bangladesh wins the series, they take out the key of Sri Lanka. | वर्ल्डकपमधील Timed-out चं भूत पुन्हा बाहेर, मालिका जिंकताच बांगलादेशने काढली श्रीलंकेची कळ  

वर्ल्डकपमधील Timed-out चं भूत पुन्हा बाहेर, मालिका जिंकताच बांगलादेशने काढली श्रीलंकेची कळ  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गतवर्षी भारतात झालेला बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील साखळी सामना कमालीचा वादग्रस्त ठरला होता. त्या सामन्यात  श्रीलंकेचा अष्टपैलू फलंदाज अँजेलो मॅथ्यूज याला बांगलादेशच्या खेळाडूंनी केलेल्या अपिलनंतर टाइम आऊट पद्धतीने बाद देण्यात आले होते. त्यावेळी बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनच्या निर्णयावर खूप टीका झाली होती. मात्र या टीकेचा काही परिणाम बांगलादेशच्या क्रिकेट संघावर झालेला दिसत नाही आहे. आज बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना झाल्यावर बांगलादेशचा फलंदाज मुशफिकूर रहिम याने असं काही केलं ज्यामुळे काही महिन्यांपूर्वी घडलेल्या टाइम आऊट प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या.  

दोन्ही संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १-१ अशा बरोबरीत असताना आज तिसरा आणि निर्णायक सामना खेळवला गेला. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २३५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची अवस्था ५ बाद १३० अशी झाली होती. याचवेळी खेळपट्टीवर आलेल्या मुशफिकूर रहिमने महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या करत संघाला ४ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. त्याबरोबरच बांगलादेशने मालिकेवर २-१ अशा फरकाने कब्जा केला. त्यानंतर श्रीलंकन खेळाडूंची खिल्ली उडवण्याची संधी रहिमने सोडली नाही.

सामन्यानंतर बक्षीस वितरण सुरू असताना मुशफिकूर रहीमने अँजेलो मॅथ्यूजसोबत घडलेल्या टाइम आऊट प्रकरणाची नक्कल केली. त्यावर बांगलादेशचे खेळाडूही खळखळून हसताना दिसले. सामन्याचं समालोचक करत असलेल्या समालोचकांनी मुशफिकूर काय करत आहे हे कळत नाही आहे, असं सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रेक्षकांना नेमका प्रकार काय आहे ते बरोब्बर समजले.  

Web Title: Bangladesh Vs Sri lanka: The ghost of Timed-out in the World Cup is out again, as soon as Bangladesh wins the series, they take out the key of Sri Lanka.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.