Join us  

बांगलादेशचा सलामीवीर तमीम इक्बाल याचा विश्वविक्रम, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू

Tamim Iqbal News : चटगाव येथे बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यात जहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळविला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 6:21 AM

Open in App

चितगाव -  देशाचे प्रतिनिधित्व करताना तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मंगळवारपर्यंत कोणाला करता आला नाही. मात्र, बुधवारी बांगलादेशचा सलामीवीर तमीम इक्बाल याने हा अनोखा विश्वविक्रम रचला आहे आणि त्याने अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज बनण्याचा बहुमान मिळविला आहे.चटगाव येथे बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यात जहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळविला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात बांगलादेशकडून टी-२० आणि वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर तमीम इक्बालने एक अनोखा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. पहिल्या डावात नऊ धावांची छोटी खेळी केल्यानंतरही तमीम इक्बाल देशाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे. अशा प्रकारे तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात देशाकडून सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे. हा असा विक्रम आहे की, जो भारताचे दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीदेखील करू शकलेले नाहीत. तेंडुलकरच्या नावावर कसोटी व वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे, तर भारतीय कर्णधार विराट कोहली याच्या नावावर टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. कसोटीशिवाय तमीम इकबाल याने वन-डे क्रिकेटमध्ये २१० सामन्यांत सात हजार ३६० धावा केल्या आहेत. त्यात १३ शतके आणि ४९ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने ७४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एक हजार ७०१ धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे.मुश्फिकुर रहीम याने ७० सामन्यांत चार हजार ४१३ धावा केल्या आहेत. यात सात शतके आणि २१ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने दोन द्विशतकेही झळकावली आहेत. या सामन्यात मुश्फिकुर रहीमदेखील खेळत आहे; परंतु अद्याप तो फलंदाजीला उतरलेला नाही. या कसोटीत पहिल्या डावात दोन धावा करताच तो पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. 

टॅग्स :बांगलादेशआंतरराष्ट्रीय क्रिकेट