Join us

Bangladesh: टी-२० विश्वचषकासाठी बांगालादेशचा संघ जाहीर, या अष्टपैलूकडे सोपवली नेतृत्वाची धुरा

T20 World Cup: पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर झाला आहे. अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेल्या या संघाचे नेतृत्व महमदुल्लाह या्च्याकडे सोपवण्यात आले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 15:19 IST

Open in App

ढाका - पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर झाला आहे. अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेल्या या संघाचे नेतृत्व महमदुल्लाह या्च्याकडे सोपवण्यात आले आहे . (T20 World Cup )अनुभवी शाकिब अल हसन, मुशफिकूर रहिम, मुस्तफिझूर रहमान यांचा या संघात समावेश आहे. (Bangladesh squad for T20 World Cup announced)

गेल्या काही काळापासून बांगलादेशचा संघ जबरदस्त फॉर्ममध्य आहे. या संघाने नुकताच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. महमदुल्लाच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या संघाचा समावेश पहिल्या फेरीसाठी ब गटात करण्यात आलेला आहे. या गटात बांगलादेशचा संघ स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी यांच्याशी भिडणार आहे. या स्पर्धेसाठी निवडलेला बांगलादेशचा संघ पुढीलप्रमाणे आहे. 

बांगलादेशचा संघमहमदुल्ला (कर्णधार), नईम शेख, सौम्या सरकार, लिट्टन कुमार दास, शकिब अल हसन, मुशफिकूर रहिम, अफिफ हुसेन, नुरुल हसन सोहन, शाक मेहेदी हसन, नसुम अहमद, मुस्तफिझूर रहमान, शोरिफूल इस्लाम, तस्किन अहमद, सैफ उद्दीन, शमिम हुसेन,  राखीव खेळाडू  - रुबेल हुसेन आणि अमिनूल इस्लाम बिपलब 

टॅग्स :बांगलादेशट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App