BAN vs SL Live : नाट्यमय घडामोडी अन् चरिथ असलंकाचे शतक; बांगलादेशसमोर तगडे लक्ष्य

BAN vs SL LIVE MATCH UPDATES : वन डे विश्वचषकात आज बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 05:54 PM2023-11-06T17:54:32+5:302023-11-06T17:54:44+5:30

whatsapp join usJoin us
  BAN vs SL match in icc odi world cup 2023 Sri Lanka set Bangladesh a target of 280 runs to win, Charith Aslanka hits a century of 108 runs  | BAN vs SL Live : नाट्यमय घडामोडी अन् चरिथ असलंकाचे शतक; बांगलादेशसमोर तगडे लक्ष्य

BAN vs SL Live : नाट्यमय घडामोडी अन् चरिथ असलंकाचे शतक; बांगलादेशसमोर तगडे लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : विश्वचषकात एखादा चमत्कार होईल आणि आपल्याला उपांत्य फेरीचे तिकिट मिळेल या आशेने आज श्रीलंकेचा संघ बांगलादेशविरूद्ध मैदानात आहे. प्रथम फलंदाजी करताना चरिथ असलंकाच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने मजबूत धावसंख्या उभारली. पथुम निसांकाने ३६ चेंडूत ४१ धावांची खेळी करून श्रीलंकेला चांगली सुरूवात करून दिली होती. त्यानंतर बांगलादेशने पुनरागमन करताना श्रीलंकेच्या कुसल परेरा (४) आणि कुसल मेडिंस (१९) यांना स्वस्तात माघारी पाठवले. त्यानंतर सदीरा समरविक्रमाने (४१) धावांची सावध खेळी करून लंकेचा डाव पुढे नेला. मग असलंकाने १०५ चेंडूत १०८ धावांची अप्रतिम खेळी करून बांगलादेशसमोर सन्मानजनक आव्हान उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. श्रीलंकेने ४९.३ षटकांत सर्वबाद २७९ धावा करून बांगलादेशला विजयासाठी २८० धावांचे लक्ष्य दिले आहे. 

बांगलादेशकडून तंजीद हसनने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर शोरफुल इस्लाम आणि कर्णधार शाकीब अल हसन यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. याशिवाय मेहदी हसनने चांगल्या लयमध्ये असलेल्या धनंजय डी सिल्वाला (३४) बाद करून श्रीलंकेला मोठा धक्का दिला. 

मॅथ्यूजची विकेट अन् वाद
श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला एका वादग्रस्त निर्णयामुळे विकेट गमवावी लागली. टाईम आऊटमुळे मॅथ्यूजला बाहेरचा रस्ता धरावा लागला अन् वाद चिघळला. मॅथ्यूज आणि बांगलादेशी खेळाडूंमध्ये बाचाबाची देखील झाली. याशिवाय पॅव्हेलियनमध्ये परतत असताना श्रीलंकन खेळाडूने हेल्मेट फेकून दिले. खरं तर फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्या फलंदाजाला तीन मिनिटांच्या आत खेळपट्टीवर पोहोचावे लागते. मॅथ्यूज मैदानात पोहोचला परंतु निर्धारित वेळेत चेंडूचा सामना करू शकला नाही. अशा स्थितीत बांगलादेशच्या कर्णधाराने 'टाईम आऊट'चा दाखला देत विकेटसाठी अपील केली, ज्यावर पंचांनी बांगलादेशच्या बाजूने निर्णय दिला. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये टाईम आउटवर बाद होणारा मॅथ्यूज जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

आजच्या सामन्यासाठी बांगलादेशचा संघ -
शाकीब अल हसन (कर्णधार), तंजीद हसन, लिटन दास, नझमुल हुसैन शांतो, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह, तौहीद हृदोय, मेहदी हसन मिराज, तन्झीम हसन शाकिब, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम. 

आजच्या सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ - 
कुसल मेंडिस (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, महिश तीक्ष्णा, दुष्मंथा चमीरा, कसून राजिथा, दिलशान मदुशंका. 

Web Title:   BAN vs SL match in icc odi world cup 2023 Sri Lanka set Bangladesh a target of 280 runs to win, Charith Aslanka hits a century of 108 runs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.