Join us  

BAN vs PAK, 1st Test : बांगलादेशनं पहिल्या कसोटीत पाकिस्तानची जिरवली; १४१ धावांत १० फलंदाजांना माघारी पाठवून आघाडी घेतली 

Bangladesh vs Pakistan, 1st Test : भारत-न्यूझीलंड यांच्यातला पहिला कसोटी सामना रंगतदार असताना चट्टोग्राम येथे सुरू असलेल्या कसोटीत बांगलादेशनं जबरदस्त खेळ केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 2:53 PM

Open in App

Bangladesh vs Pakistan, 1st Test : भारत-न्यूझीलंड यांच्यातला पहिला कसोटी सामना रंगतदार असताना चट्टोग्राम येथे सुरू असलेल्या कसोटीत बांगलादेशनं जबरदस्त खेळ केला. ट्वेंटी-२० मालिकेतील पराभवानंतर बांगलादेशनं पहिल्याच कसोटीत पाकिस्तानची जीरवली. बांगलादेशच्या तैजूल इस्लामनं ७ विकेट्स घेताना बिनबाद १४६ अशा मजबूत अवस्थेत असलेल्या पाकिस्तानचा संपूर्ण डाव २८६ धावांवर गुंडाळला. बांगलादेशन पहिल्या डावात आघाडी मिळवताना पाकिस्तानला बॅकफूटवर फेकले.

बांगलादेशनं पहिल्या डावात ३३० धावा केल्या. मुश्फीकर रहीम व लिटन दास यांनी पाचव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी करताना ४ बाद ४९ वरून संघाला २५५ धावांपर्यंत पोहोचलवले. लिटन दास २३३ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारांसह ११४ धावांवर माघारी परतला. रहीम २२५ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीनं ९१ धावांवर बाद झाला. हे दोघे माघारी परतल्यानंतर बांगलादेशचा डाव गडगडला. मेहीदी हसननं ३८ धावा करताना संघाच्या धावसंख्येत भर घातली. हसन अलीनं ५१ धावांत ५ विकेट्स घेतल्या. शाहिन आफ्रिदी व फहीम अश्रफ यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

 प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. अबीद अली व अबदुल्लाह शाफिक यांनी  पहिल्या विकेटसाठई १४६ धावा जोडल्या. अबीदनं २८२ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह १३३ धावा केल्या, तर शाफिकनं ५२ धावा केल्या. कर्णधार बाबार आजम १० धावांवर बाद झाला.  तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा पाकिस्तानच्या बिनबाद १४० धावा होत्या. पण, त्यांचे १० फलंदाज १४१ धावांवर माघारी पाठवून बांगलादेशनं पहिल्या डावात ४४ धावांची आघाडी घेतली. तैजुलनं ११६ धावा देताना ७ विकेट्स  घेतल्या. एबाडोत होसैननं दोन,  तर मेहीदी हसननं एक विकेट घेतली.  

टॅग्स :बांगलादेशपाकिस्तान
Open in App