रवींद्र जडेजावर एका सामन्याची बंदी

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या रवींद्र जडेजावर आयसीसीनं एका सामन्याची बंदी घातली आहे. कोलंबो कसोटीतील तिसऱ्या डावात जडेजानं शिस्तभंग केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:13 IST2017-08-06T18:03:42+5:302017-08-06T23:13:29+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
A ban on Ravindra Jadeja | रवींद्र जडेजावर एका सामन्याची बंदी

रवींद्र जडेजावर एका सामन्याची बंदी

कोलंबो, दि. 6 - दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या रवींद्र जडेजावर आयसीसीनं एका सामन्याची बंदी घातली आहे. कोलंबो कसोटीतील तिसऱ्या डावात जडेजानं शिस्तभंग केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 24 महिन्यात रवींद्र जडेजानं सहाव्यांदा नियमाचे उल्लघंन केलं आहे. आयसीसीच्या या कारवाईमुळे श्रीलंकेविरोधात होणाऱ्या पालेकेलेतील तिसऱ्या कसोटी सामन्याला रवींद्र जडेजा मुकावे लागणार आहे. दुसऱ्या कसोटीमध्ये रद्र जडेजाने फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी केली होती. तर गोलंदाजीमध्ये आपली कमाल दाखवताना दुसऱ्या डावात पाच फलंदाजाला बाद करत श्रीलंकेचा निम्मा संघ गारद केला होता. तर पहिल्या डावात अश्विनला साथ देताना दोन फलंदाजांची शिकार केली होती.

कोलंबो कसोटीत जाडेजाने स्वत:च्या गोलंदाजीवर अडवलेला चेंडू फलंदाज करुणारत्नेच्या दिशेने अतिशय धोकादायक पद्धतीनं थ्रो केला होता. या प्रकरणात आयसीसीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्यामुळे जाडेजाला तीन दंड गुण आणि कसोटी मानधनाच्या 50 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला. पण गेल्या 24 महिन्यांत जाडेजाच्या बेशिस्त वर्तनासाठीच्या एकूण दंड गुणांची संख्या सहावर गेली. त्यामुळे आयसीसीच्या नियमावलीनुसार त्याच्यावर एका कसोटीतून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दुसऱ्या कसोटीत भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि53 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या मालिकेत भारताकडून पहिल्या डावात अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांनी शतकी खेळी केल्या. तर गोलंदाजीत रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात तर रवींद्र जाडेजाने दुसऱ्या डावात चमकदार कामगिरी केली. श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात गडगडला, मात्र दुसऱ्या डावात दिमुथ करुणरत्ने आणि कुशल मेंडीसच्या शतकी खेळीच्या जोरावर लंकेने भारताचा काही प्रमाणात नेटाने सामना केला. मात्र इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने श्रीलंकेला डावाचा पराभव सहन करावा लागला.

Web Title: A ban on Ravindra Jadeja