Join us  

काश्मीरच्या लहानग्याने टाकला 'बॉल ऑफ द सेंचुरी', शेन वॉर्ननेही केले कौतुक

काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील एका लहानग्याने एक भन्नाट चेंडू टाकला आणि वॉर्नने त्याला 'बॉल ऑफ द सेंचुरी' असे म्हणत गौरवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 6:53 PM

Open in App

नवी दिल्ली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : : क्रिकेट विश्वामध्ये 'बॉल ऑफ द सेंचुरी' हा मान ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्नला मिळाला आहे. पण काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील एका लहानग्याने एक भन्नाट चेंडू टाकला आणि वॉर्नने त्याला 'बॉल ऑफ द सेंचुरी' असे म्हणत गौरवले आहे.

काश्मीरमधील सात वर्षांच्या अहमदने एका स्थानिक सामन्यात असा काही चेंडू टाकला की त्याची चर्चा आता क्रिकेट विश्वात होत आहे. या चेंडूचा व्हिडीओ शेन वॉर्नला पाठवण्यात आला. त्यावर शेन वॉर्न म्हणाला की, " ही गोष्ट शानदार आहे. चांगला चेंडू टाकलास मित्रा. " 

हा पाहा व्हिडीओ

अहमदचा हा व्हिडीओ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पहिल्या कसोटी दरम्यानही दाखवण्यात आला. त्यावेळी वॉर्नही तिथे उपस्थित होता. फॉक्स क्रिकेटने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे की, " हा 'बॉल ऑफ द सेंचुरी' आहे आणि शेन वॉर्ननेही या गोष्टीला मंजूरी दिली आहे."

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया