Join us  

पांड्या, राहुलच्या मदतीला धावला भाजपा खासदार; कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील विधानानंतर हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांची क्रिकेट कारकीर्द धोक्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 2:37 PM

Open in App
ठळक मुद्देहार्दिक पांड्या व लोकेश राहुल निलंबितवर्ल्ड कप स्पर्धाही मुकणार असल्याचे डायना एडुल्जींचे संकेतपांड्या व राहुल यांची कारकीर्द संपवण्याचा डाव असल्याचा आरोप

नवी दिल्ली : कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील विधानानंतर हार्दिक पांड्यालोकेश राहुल यांची क्रिकेट कारकीर्द धोक्यात आली आहे. महिलांचा अपमान करणाऱ्या त्या वक्तव्यानंतर पांड्या व राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तोपर्यंत त्यांना बीसीसीआय, आयसीसी आणि राज्य संघटनांच्या कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही. 

प्रशासकीय समितीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहा सदस्यीय समितीही नेमली आहे आणि त्यानंतर या दोघांना कोणती शिक्षा देण्यात यावी याबाबतचा निर्णय होईल. पांड्या व राहुल यांच्यावर काही महिन्यांच्या बंदीची कारवाई झाल्यास त्यांना इंडियन प्रीमिअर लीग आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावे लागेल. प्रशासकीय समिती सदस्य आणि माजी क्रिकेटपटून डायना एडुल्जी यांनी हे दोघं वर्ल्ड कप खेळू शकणार नाही, असे संकेत दिले होते.

प्रशासकीय समिती आणि बीसीसीआय या प्रकरणाचा तपास करत आहेत. असे असताना एडुल्जींचे हे विधान म्हणने पांड्या व राहुल यांची कारकीर्द संपविण्याचा प्रयत्न असल्याची टीका केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी केली. त्यांनी एखाद्याला ताकीद देणं आणि कारकीर्द संपुष्टात आणणं यामधील बारीक रेषा एडुल्जी यांना समजावण्याचा प्रयत्न केला. ''डायना एडुल्जी यांनी भारतीय क्रिकेटला दिलेलं योगदान मोलाचं आहे. त्यांचा मी आदर करतो, परंतु त्या अजुनही जुनाट विचार सोबत घेऊन चालत आहेत. पांड्या जे काही म्हणाला ते निषेधार्ह आहे, परंतु त्यासाठी या युवा खेळाडूंच्या कारकिर्दीशी खेळणे चुकीचे आहे'', असे सुप्रियो यांनी ट्विट केले.  

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात पांड्या असं नक्की बोलला तरी काय? करण जोहर : नाईट क्लबमध्ये तु मुलींना त्यांची नावं का नाही विचारत?हार्दिक पांड्याः मला प्रत्येकीची नावं लक्षात राहत नाही. क्लबमध्ये मुली कशा चालतात हे मला पाहणे आणि निरिक्षण करायला आवडते. त्या कशा चालतात हे पाहण्यासाठी मी त्यांच्या मागेच उभा राहतो. मी जेव्हा पहिल्यांदा सेक्स केले. तेव्हा मी घरी येऊन म्हणालो की, मै करके आया आज ( आज मी करून आलो).''कुटुंबीयही  किती कूल आहेत हे पांड्या सांगू लागला. तो म्हणाला,''एका पार्टीमध्ये आई-वडिलांनी मला विचारले, अच्छा तेरा वाला कौन सा है ( यातील तुझी गर्लफ्रेंड कोण?). त्यावेळी मी ही, ही, ही ( अनेक मुलींकडे बोट दाखवत) असे म्हणालो आणि त्यावर त्यांनी माझा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया दिली. ''करण जोहर : तुम्ही दोघं एकाच मुलीच्या मागे लागलात, तर त्याचा निर्णय कसा घ्याल?लोकेश राहुल : हा निर्णय त्या मुलीवर सोडूहार्दिक पांड्या : असं काही नसत, सर्व काही टॅलेंटवर अवलंबून आहे. ज्याला मिळेल त्यानं घेऊन जावं. 

 

टॅग्स :हार्दिक पांड्याकॉफी विथ करण 6लोकेश राहुलबीसीसीआयबाबुल सुप्रियो