IND vs AUS 1st ODI : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय बॅटरच्या तुलनेत पावसानेच अधिक बॅटिंग केली. परिणामी दोन्ही संघातील पहिला एकदिवसीय सामना प्रत्येकी २६-२६ षटकांचा करण्यात आला. लोकेश राहुलनं ३८ (३१) दाखवलेला क्लास, अक्षर पटेलनं ३१ (३८) केलेली उपयुक्त खेळी आणि अखेरच्या षटकात नितीश कुमार रेड्डीनं २ षटकाराच्या मदतीने ११ चेंडूत केलेल्या नाबाद १९ धावांच्या जोरावर भारतीय संघाने ९ विकेट्सच्या मोबदल्यात २६ षटकात १३६ धावा केल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय संघाने ९ विकेट्सच्या मोबदल्यात १३६ धावा केल्या, पण ऑस्ट्रेलिया मिळालं त्यापेक्षा कमी टार्गेट
पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार, ऑस्ट्रेलियाला २६ षटकांत १३१ धावांचे टार्गेट मिळाले आहे. क्रिकेटच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे ज्या ज्या वेळी सामना थांबवण्याची वेळ येते आणि षटके कमी करण्याचा खेळ रंगतो त्यावेळी डकवर्थ लुईस नियम लागू करण्या येतो. या नियमानुसारच, ऑस्ट्रेलियाला सुधारित लक्ष्य दिल्याचे पाहायला मिळाले.
भारतीय संघानं जेवढ्या धावा केल्या त्यापेक्षा कमी धावसंख्येचं टार्गेट मिळण्यामागचं कारण..
डकवर्थ लुईस नियमानुसार सुधारिरत लक्ष देताना, पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने केलेली धावसंख्या आणि हातात असलेल्या विकेट्स म्हणजे फलंदाजीतील क्षमता याचा विचार करुन दुसऱ्या संघाला लक्ष्य दिले जाते. भारतीय संघाने २६ षटकात ९ विकेट्स गमावल्या त्यामुळे टीम इंडियाची कमी करण्यात आलेल्या २४ षटकांच्या तुलनेत फलंदाजीतील क्षमता कमी झाली. परिणामी ऑस्ट्रेलियाला भारतीय संघाने केलेल्या धावसंख्येपेक्षा कमी टार्गेट मिळाले. जर कमी करण्यात आलेल्या षटकांच्या खेळात भारताच्या हातात अधिक विकेट असत्या तर २६ षटकात ऑस्ट्रेलियाला १३६ धावांपेक्षा अधिक लक्ष्य मिळू शकले असते.
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
रोहित-विराटसह शुबमन गिलचाही फ्लॉप शो
पर्थच्या मैदानातील सामन्यात भारताचा माजी कर्णदार रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीवर सर्वांच्या नजरा होत्या. पण दोघेही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. गोलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या पर्थच्या खेळपट्टीवर रोहित शर्मा ८ धावा करून बाद झाला. विराट कोहलीला तर ८ चेंडू खेळूनही खाते उघडता आले नाही. पहिल्यांदा वनडे संघाचे नेतृत्व करताना शुबमन गिलही अपयशी ठरला. त्याने दुहेरी आकडा गाठला, पण १८ चेंडूत तो १० धावा करून तंबूत परतला. जोश हेजलवडूसह मिचेल ओव्हन आणि मॅथ्यू कुन्हेमन यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्क आणि नॅथन एलिस यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.