Join us  

ऑस्ट्रेलियन कंपनीला सचिनने खेचले कोर्टात

माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने बॅट बनविणाऱ्या ऑस्ट्रेलियन कंपनीविरोधात कोर्टामध्ये दावा ठोकला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 2:57 AM

Open in App

मेलबोर्न : माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने बॅट बनविणाऱ्या ऑस्ट्रेलियन कंपनीविरोधात कोर्टामध्ये दावा ठोकला आहे. सिडनी स्थित स्पार्टन्स स्पोर्ट्स कंपनी आणि सचिन तेंडुलकर यांच्यात २०१६ साली करार झाला होता. करारानुसार सचिनचे नाव आणि फोटो स्पार्टन्स कंपनी आपल्या उत्पादनाच्या प्रसिद्धीसाठी वापरणार होती. यासाठी प्रतिवर्षी सचिनला अंदाजे ७ कोटी रुपयांचे मानधन देण्याचे ठरले होते. मात्र सलग दोन वर्ष कंपनीने सचिनला मानधन न देता, नाव आणि फोटो वापरणे सुरू ठेवले. यापोटी अंदाजे ३० लाख डॉलर थकीत असल्याचे सचिनच्यावतीने दाव्यात स्पष्ट करण्यात आले.कंपनीसोबत झालेल्या करारानुसार सचिनने लंडन आणि मुंबई येथील एका कार्यक्रमात हजर राहून बॅटचे प्रमोशन केले. भारताचे उद्योगपती कुणाल शर्मा हे कंपनीचे सहव्यवस्थापक आहेत. सप्टेंबर २०१८ पासून मानधनासाठी कंपनीकडे पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर सचिनने कायदेशीर सल्लागारांच्या मदतीने स्पार्टन्स कंपनीसोबतचा करार मोडला. मात्र यानंतरही कंपनीने सचिनचे नाव आणि फोटो वापरणे सुरू ठेवल्याने सचिनने कोर्टात धाव घेतली आहे. सचिनने किती नुकसानभरपाई मागितली, याबद्दल कळू शकले नाही.

टॅग्स :सचिन तेंडुलकर